बापरे! 'बिग बॉस'मध्ये जाण्यासाठी दिला बकऱ्याचा बळी; Ex स्पर्धकाचा धक्कादायक खुलासा
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 22, 2024 16:01 IST2024-12-22T15:59:09+5:302024-12-22T16:01:09+5:30
"बिग बॉसमध्ये येण्यासाठी काळी जादू केली", गायकाच्या लेकाचा धक्कादायक खुलासा, म्हणाला- "मी कोंबडी आणि बकरी..."

बापरे! 'बिग बॉस'मध्ये जाण्यासाठी दिला बकऱ्याचा बळी; Ex स्पर्धकाचा धक्कादायक खुलासा
'बिग बॉस' हा छोट्या पडद्यावरील अतिशय लोकप्रिय रिएलिटी शो आहे. कित्येक सेलिब्रिटींना या शोमुळे प्रसिद्धी मिळाली आहे. तर 'बिग बॉस'मध्ये आल्यानंतर अनेकांचं नशीबच पालटलं आहे. त्यामुळेच या शोमध्ये जाण्याची अनेक सेलिब्रिटींची इच्छा असते. 'बिग बॉस'च्या अशाच एका स्पर्धकाने धक्कादायक खुलासा केला आहे. 'बिग बॉस'मध्ये येण्यासाठी काळी जादू केल्याचा खुलासा प्रसिद्ध गायक कुमार सानू यांचा लेक आणि 'बिग बॉस'चा माजी स्पर्धक जान सानू याने केला आहे.
जान कुमार सानूने नुकतंच पारस छाबडा याच्या पॉडकास्टला हजेरी लावली. या मुलाखतीत त्याने 'बिग बॉस'मध्ये जाण्यासाठी काळी जादू केल्याचा धक्कादायक खुलासा केला. "मी बंगाली आहे. 'बिग बॉस'मध्ये मी काळी जादू केल्यामुळे आलो", असं जान सानू म्हणाला. त्याच्या या वक्तव्यावर विश्वास न बसल्याने पारस छाबडाने त्याला "बकवास करू नकोस" असं म्हटलं. त्यावर जान सानू म्हणाला, "मी खरं सांगतोय". कोलकत्ताला गेलेला असताना एका महिलेने त्याला असं करण्यास सांगतिल्याचं तो म्हणाला.
"मी कोलकात्याला गेलो होतो. तिथे एका महिलेला मी भेटलो. त्यांनी काही माकडं पाळली होती. त्यांच्याशी बोलल्यानंतर मला कळलं की ती माकडं नाही तर माणसं होती. ज्यांना माकड बनवून पाळलं होतं. त्यांनी मला सांगितलं की तुला जे हवंय त्यासाठी तुला कोंबडी आणि बकरीचा बळी द्यावा लागेल. त्या काळ्या रंगाच्या बाहुलीचा उपयोग कसा होतो ते मी प्रत्यक्षात पाहिलं आहे. माझं ध्येय मोठं होतं. त्यामुळे मला हे करावं लागलं. त्यानंतर मला बिग बॉसमधून फोन आला. हे खरंच असं घडलं आहे", असं जान सानूने सांगितलं. जान सानू बिग बॉस १४मध्ये सहभागी झाला होता.