बिग बॉस स्पर्धक शिल्पा शिंदे आणि विकास गुप्ता होते नात्यात दाक्षिणात्य अभिनेत्री गेहना वसिष्ठने केला खळबळजनक खुलासा
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 2, 2017 13:05 IST2017-11-02T07:35:21+5:302017-11-02T13:05:21+5:30
शिल्पा शिंदे आणि विकास गुप्ता सध्या प्रेक्षकांना बिग बॉस या कार्यक्रमात पाहायला मिळत आहेत. या कार्यक्रमात त्यांची सतत भांडणे ...

बिग बॉस स्पर्धक शिल्पा शिंदे आणि विकास गुप्ता होते नात्यात दाक्षिणात्य अभिनेत्री गेहना वसिष्ठने केला खळबळजनक खुलासा
श ल्पा शिंदे आणि विकास गुप्ता सध्या प्रेक्षकांना बिग बॉस या कार्यक्रमात पाहायला मिळत आहेत. या कार्यक्रमात त्यांची सतत भांडणे पाहायला मिळत आहेत. बिग बॉसचा हा सिझन आतापर्यंतच्या सगळ्या सिझनमधील इंटरेस्टिंग सिझन मानला जात आहे. पहिल्या दिवसापासून सगळेच स्पर्धक एकमेकांशी प्रचंड भांडत आहेत. तसेच अतिशय वाईट शब्दांत एकमेकांशी बोलत आहेत. एकमेकांना शिव्या घालत आहेत. एवढेच नव्हे तर एकमेकांविषयी माहीत असलेली गुपिते लोकांसमोर मांडत आहेत. जुबैर खान या स्पर्धकाने तर बिग बॉसच्या घरात आत्महत्या देखील करण्याचा प्रयत्न केला. जुबैरची तब्येत आता चांगली असून त्याने सलमानविरोधात पोलिसात केस देखील दाखल केली आहे. त्यामुळे बिग बॉसच्या घरातील ड्रामा लोकांचे लक्ष वेधून घेत आहे. शिल्पा शिंदेने भाभीजी घर पर है या मालिकेत काम केले होते. तिच्या या मालिकेची चांगलीच चर्चा झाली होती. पण या कार्यक्रमाच्या निर्मात्यांसोबत झालेल्या वादामुळे तिने या कार्यक्रमाला रामराम ठोकला. शिल्पाने मालिका सोडली त्यावेळी विकास गुप्ता हा अँड टिव्हीचा क्रिएटिव्ह हेड होता. विकासने त्यावेळी शिल्पाची बाजू न घेतल्याने शिल्पाचा विकासवर चांगलाच राग आहे. त्यामुळे ती पहिल्या दिवसापासून विकाससोबत भांडताना आपल्याला दिसत आहे. पण असे असले तरी शिल्पा आणि विकास हे खऱ्या आयुष्यात नात्यात होते असा खळबळजनक खुलासा गेहना वसिष्ठ या दाक्षिणात्य अभिनेत्रीने केला आहे. भाभीजी घर पर है या मालिकेच्या वेळीच शिल्पा आणि विकास नात्याच असल्याने गेहनाने एका मुलाखतीत म्हटले आहे. गेहनानुसार ते नात्यात होते. एवढेच नव्हे तर त्यांच्यात शारीरिक संबंध देखील होते. पण विकासला शिल्पापेक्षा त्याची नोकरी प्रिय असल्याने शिल्पाला त्याने भाभीजी घर पर है या मालिकेच्या बाबतीत पाठिंबा दिला नाही. शिल्पा विकासमध्ये भावनिकरित्या गुंतलेली होती. पण विकासला तिच्यासोबत केवळ शारीरिक संबंध ठेवण्यात रस होता. याच कारणाने भाभीजी घर पर है या मालिकेच्या घडलेल्या घटनांबाबत विकासला ती आजही जबाबदार मानते.
Also Read : बिग बॉसमधील हे स्पर्धक अडकणार लग्नाच्या बंधनात
Also Read : बिग बॉसमधील हे स्पर्धक अडकणार लग्नाच्या बंधनात