Bigg Boss : 'बिग बॉस'चा आवाज अतुल कपुर आला या कारणांमुळे चर्चेत
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 4, 2017 18:08 IST2017-02-04T07:43:02+5:302017-02-04T18:08:54+5:30
बिग बॉस चाहते है असे म्हणत या अवलियाने घराघरांत आपल्या आवाजाने बिग बॉस या शो ची लोकप्रियता वाढवली असे ...
.jpg)
Bigg Boss : 'बिग बॉस'चा आवाज अतुल कपुर आला या कारणांमुळे चर्चेत
ब ग बॉस चाहते है असे म्हणत या अवलियाने घराघरांत आपल्या आवाजाने बिग बॉस या शो ची लोकप्रियता वाढवली असे म्हणणे चुकीते ठरणार नाही. आजपर्यंत या कार्यक्रमाचे 10 पर्व पार पडले आहेत. मात्र बिग बॉस या शोमध्ये स्पर्धकांशी संवाद साधणारा व्यक्ती नेमका कोण या प्रश्नाते उत्तर काही सुटता सुटत नव्हते. मात्र काही दिवसांपूर्वीच बिग बॉस शो संपताचा हा भारदस्त आवाज असणारा व्यक्तीचा चेहरा समोर आला. फक्त एकच फोटो सोशलमिडियावर व्हायरल होताच रसिकांना कित्येकवर्ष पडलेल्या कोड्याचे समाधान कारक उत्तर मिळाले. होय, बिग बॉसच्या भारदस्त आवाज असणारा व्यक्ती म्हणजे व्हॉईल ओव्हर आर्टीस्ट अतुल कपूर यांनीच गेले 10 वर्ष सेलिब्रेटी स्पर्धकांप्रमाणे आपल्या आवाजाने रसिकांना या शोशी खिळवून ठेवेले.
अतुल कपूर यांनी व्हॉईस ओव्हर आर्टीस्ट म्हणून अनेक हॉलिवूड सिनेमांनाही आपला आवाज दिला आहे. बिग बॉसच्या पहिल्यापर्वापासून अतुल या शोला जोडले गेले आहेत. शोवेळी संपूर्ण वेळ ते सेटवरच राहतात. अतुल यांच्याबदद्ल माहिती प्रेक्षक आणि बिग बॉस स्पर्धकांपासूनही लपवली जाते.या शोमध्ये लोकप्रिय सेलिब्रिटी ३ महिन्यांसाठी एका घरात बंद असतात. बाहेरच्या जगाशी त्यांचं अजिबात काही कनेक्शन नसतं. घरातील या सर्व सदस्यांवर एका व्यक्तीची नेहमी नजर असते. ती म्हणजे ‘बिग बॉस’ ची म्हणजेच अतूल कपूर यांची.अतुल कपूर हेच बिग बॉसचा आवाज बनत घरातील सदस्यांना रागावताना, त्यांना सूचना करताना किंवा काही टास्क देतात. जेव्हाही घरातील सदस्यांमुळे बिग बॉसचा मूड ऑफ होतो तेव्हा ते सदस्यांना कन्फेशन रूममध्ये बोलवून त्यांना समजावून सांगतात. बिग बॉसचा आवाज इतका प्रभावी आहे की,त्यांना न पाहताही त्या आवाजामुळे व्यक्ती त्यांच्या प्रेमात पडल्याशिवाय राहत नाही. त्यामुळे आवाज ही पेहचान है ही ओळ अतुल कपूर यांच्यासाठी लागू पडते.