Bigg Boss: या अभिनेत्रीने सलमान खानच्या मुलांना भेटण्याची इच्छा केली व्यक्त
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 9, 2018 12:29 IST2018-01-09T06:59:56+5:302018-01-09T12:29:56+5:30
सलमान खान म्हणजे सबका भाईजान असे म्हणणे चुकीचे ठरणार नाही.कारण सलमान खानला आजपर्यंत विचारण्यात आलेला प्रश्न कोणता हे आपल्याला ...

Bigg Boss: या अभिनेत्रीने सलमान खानच्या मुलांना भेटण्याची इच्छा केली व्यक्त
स मान खान म्हणजे सबका भाईजान असे म्हणणे चुकीचे ठरणार नाही.कारण सलमान खानला आजपर्यंत विचारण्यात आलेला प्रश्न कोणता हे आपल्याला सा-यांनाचा माहिती आहे. सलमान लग्न कधी करणार या प्रश्नाची सलमानला खूप चिड येते हे सर्वश्रृत आहे. त्यामुळे एका अभिनेत्रीने सलमानला हा प्रश्न विचारायची गरज नसून आता थेट त्याच्या मुलांना भेटायची इच्छा असल्याचे म्हटले आहे. होय, ती अभिनेत्री कोण जिला सलमानच्या लग्नातही इंटरेस्ट नसून थेट त्याच्या मुलांमध्ये इंटरेस्ट आहे. तर ती अभिनेत्री आहे राणी मुखर्जी.नुकतेच बिग बॉसच्या सेटवर राणी तिचा आगामी सिनेमा हिचकीच्या प्रमोशनसाठी उपस्थित होती.त्यावेळी तिने सलमानला आपल्या सिनेमाविषयी माहिती तर दिलीच शेवटी जाता जाता मनमोकळ्यापणाने आपल्या मनातील गोष्टीही सलमानला सांगितल्या. इतकेच नाही तर सलमासह काम केलेल्या सिनेमातल्या आठवणींनाही उजाळा दिला.यावेळी राणीने सलमानला एक मोलाचाही सल्ला दिल्याचे पाहायला मिळाले. लग्न वगैर हे सगळं ठिक आहे. आता आपण 2018मध्ये प्रवेश केला आहे. त्यामुळे आता पुढच्या गोष्टीचा विचार करण्याची गरज असल्याचे सांगत राणीने सलमानला चक्क लग्न न करण्याचा सल्ला दिला आहे. मुख्य म्हणजे लग्न न करताच तू बाबा हो, असे तिने त्याला सांगितले. त्यामुळे दबंग खान असलेला तरीही सगळ्यांचाच भाईजान बनलेला सलमान या वर्षातही बोहल्यावर चढणार का हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.
Also Read:राणी मुखर्जीनेही केली सलमान खानसारखीच ‘चोरी’!
‘हिचकी’चा ट्रेलर एका हॉलिवूड चित्रपटाची हुबेहुब कॉपी असल्याचे समोर आले आहे. हा हॉलिवूड चित्रपट कुठला तर ‘फ्रंट आॅफ द क्लास’. हॉलिवूडच्या या चित्रपटात एका टॉरेट सिंड्रोमने ग्रस्त तरूणाची कथा आहे. या आजारामुळे तो बोलण्यात अडखळतो. पण या कमतरतेवर मात करत तो सगळ्यांचा आवडता टीजर बनतो. ‘फ्रंट आॅफ द क्लास’ हा चित्रपट ब्रॅड कोहेनच्या कादंबरीवर आधारित चित्रपट होता. ‘हिचकी’चाट्रेलर ‘फ्रंट आॅफ द क्लास’चा कॉपी असल्याचे उघड झाल्यावर आधी यशराज बॅनरने हे वृत्त नाकारले होते. आमचा हा चित्रपट कॉपी नाहीच, असे यशराजने म्हटले होते. पण ‘हिचकी’चे दिग्दर्शक सिद्धार्थ पी. मल्होत्रा यांनी मात्र कॉपीचा आरोप अप्रत्यक्षपणे मान्य केलाआहे. आमच्याकडे ब्रॅड कोहेन यांच्या पुस्तकाचे हक्क आहेत, असे त्यांनी सांगितले आहे.