2 वर्षानंतर 'Bigg boss' फेम अभिनेत्याची जेलमधून होणार सुटका; 'या' कारणामुळे भोगत होता शिक्षा
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 19, 2023 16:52 IST2023-05-19T16:51:30+5:302023-05-19T16:52:29+5:30
Ajaz khan: गेल्या वर्षी त्याने जामीनासाठी अर्ज केला होता. मात्र, सप्टेंबरमध्ये मुंबई उच्च न्यायालयाने त्याचा जामीन अर्ज फेटाळून लावला.

2 वर्षानंतर 'Bigg boss' फेम अभिनेत्याची जेलमधून होणार सुटका; 'या' कारणामुळे भोगत होता शिक्षा
छोट्या पडद्यावरील वादग्रस्त पण तितकाच चर्चेत येणारा शो म्हणजे बिग बॉस (bigg boss) आतापर्यंत या शोचे अनेक पर्व गाजले आहेत. त्यामुळे यात सहभागी झालेले काही सेलिब्रिटी स्पर्धकही चर्चेचा भाग झाले. यामध्येच सध्या बिग बॉस ७ मध्ये सहभागी झालेल्या एका अभिनेत्याची चर्चा रंगली आहे. तब्बल २ वर्षानंतर त्याची तुरुंगातून सुटका करण्यात आली आहे. अंमली पदार्थांची विक्री केल्या प्रकरणी त्याला अटक करण्यात आली होती.
बिग बॉस 7 मध्ये सहभागी झालेला अभिनेता एजाज खान (ajaz khan) याची आज आर्थर रोड कारागृहातून सुटका होणार आहे. दोन वर्षांपूर्वी त्याला ड्रग्ज प्रकरणात अटक करण्यात आली होती. अखेर शिक्षा भोगून झाल्यानंतर आज संध्याकाळी ६.३० वाजता तो तुरुंगातून बाहेर येणार आहे.
१९ मे रोजी मुंबई उच्च न्यायालयाने एजाजचा जामीन मंजूर केला. त्यानंतर तो तुरुंगातून बाहेर येणार आहे. मीडिया सूत्रांच्या माहितीनुसार, एजाज तुरुंगातून बाहेर येणार असल्यामुळे त्याच्या कुटुंबाने आनंद व्यक्त केला आहे. त्याच्या पत्नीने यावर प्रतिक्रिया देत हा आमच्या कुटुंबासाठी आनंदाचा क्षण असल्याचं तिने म्हटलं.
नेमकं काय आहे प्रकरण?
अंमली पदार्थांची तस्करी आणि विक्री केल्याप्रकरणी एजाज खान याला अटक करण्यात आली होती. नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोने (एनसीबी) एप्रिल 2021 मध्ये एजाजच्या घरावर छापा टाकला होता. यावेळी टाकलेल्या छाप्यामध्ये त्याच्या घरातून ड्रग्ज जप्त करण्यात आले होते. त्यानंतर त्याला अटक करण्यात आली. गेल्या वर्षी त्याने जामीनासाठी अर्ज केला होता. मात्र, सप्टेंबरमध्ये मुंबई उच्च न्यायालयाने त्याचा जामीन अर्ज फेटाळून लावला.
कोण आहे एजाज खान?
एजाज हा छोट्या पडद्यावरील लोकप्रिय अभिनेता आहे. त्याने मालिकांसह रिअॅलिटी शोमध्येही सहभाग घेतला आहे. यात 'दिया और बाती हम', 'मिट्टी की बनो', 'करम अपना अपना' सारख्या मालिकांमध्ये त्याने काम केलं आहे. तर 'खतरों के खिलाडी' आणि 'बिग बॉस' या कार्यक्रमांमध्येही तो झळकला आहे.