"मी बघितलं, काय-काय बोललास माझ्याबद्दल..." सलमानचा प्रणितसोबत मराठीत संवाद, VIDEO पाहिलात?
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 31, 2025 10:45 IST2025-08-31T10:44:29+5:302025-08-31T10:45:49+5:30
'बिग बॉस १९'च्या घरात पहिल्या 'वीकेंड का वार'मध्ये काय घडलं?

"मी बघितलं, काय-काय बोललास माझ्याबद्दल..." सलमानचा प्रणितसोबत मराठीत संवाद, VIDEO पाहिलात?
Salman Khan Slams Pranit More: 'बिग बॉस १९'चा पहिला 'वीकेंड का वार'चा एपिसोड खूपच धमाकेदार होता. पहिल्याच आठवड्यात स्पर्धकांमध्ये सुरू असलेल्या वादांवर सलमान खानने भाष्य केले. याचवेळी त्याने स्टँड-अप कॉमेडियन प्रणीत मोरेची चांगलीच शाळा घेतली. 'बिग बॉस'च्या घरात येण्यापूर्वी प्रणीतने सलमान खानवर अनेक विनोद केले होते, ज्याची क्लिप सध्या व्हायरल होत आहे. प्रणीतने एका स्टँड-अप शोमध्ये "सलमान पैसे खातच नाही, तो लोकांचं करिअर खातो" असे म्हटले होते. याशिवाय, "रोहित शेट्टीने सलमानला सांगितलं की, सिनेमात गाडी कशीही चालवू शकतो, तेव्हा सलमानने लगेच 'कुठे सही करायचीये?' असं विचारलं" असेही विनोद त्याने केले होते.
'वीकेंड का वार'मध्ये सलमानने प्रणीतला मराठीत विचारले, "मी बघितलं, काय-काय बोललास माझ्याबद्दल..." त्यावर प्रणीतने "जाऊद्या सर, जुन्या गोष्टींवर माती टाका" असे म्हटले. सलमान म्हणाला, "टाकली माती". यावेळी सलमानने प्रणीतला समजावून सांगितले, "हे बघ प्रणीत, जेव्हा एखादा व्यक्ती सुरक्षित अंतरावर असतो, तेव्हा त्याच्याबद्दल बोलणे खूप सोपे असते. तू लोकांना हसवण्यासाठी माझे नाव वापरले, पण तू मर्यादा ओलांडायला नको होतीस. माझं नाव बरोबर किंवा चुकीचे वापरुन जर तू दोन पैसे कमावत असशील तर मी तुझ्यासाठी आनंदी आहे. मी नाराज नाहीये. तुमच्यापैकी बहुतेक जण असेच करतात. कपिल शर्मा आणि कृष्णा अभिषेक देखील माझ्यावर विनोद करतात, पण ते स्टँड-अप कॉमेडियनसारखे करत नाहीत. जर त्यामुळे तुमचा फायदा होत असेल तर, तुम्हाला माझ्याबद्दल जे बोलायचं आहे, ते बोला".
Salman Khan handled the #PranitMore situation really well !!!#BB19 • #BiggBoss19 • #SalmanKhanpic.twitter.com/zCw5VqSVLk
— 𝐒en⚡ (@sanskaaari_af) August 30, 2025
पुढे सलमानने प्रणीतला सल्ला दिला की, घरात त्याने मर्यादा ओलांडून खेळू नये. सलमान म्हणाला, "जर तू खालच्या दर्जाचं खेळलास, तर इतर स्पर्धकही तुझ्यासोबत तसेच खेळतील. कारण, ते माझ्याएवढे समजून घेणार नाहीत", असे म्हणत त्याने प्रणीतला योग्य खेळ खेळण्याचा सल्ला दिला. हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर नेटकऱ्यांनी प्रतिक्रिया देण्यास सुरुवात केली आहे. एका युजरने "प्रणित, तू बिग बॉसमध्ये आला नाहीस, तुला इथे आणले आहे" अशी कमेंट केली आहे.