Bigg Boss 19: शिव ठाकरेचा 'महाराष्ट्रीयन भाऊ'ला फूल सपोर्ट! प्रणित मोरेसाठी केली पोस्ट, म्हणाला- "भाऊ..."
By कोमल खांबे | Updated: November 16, 2025 11:52 IST2025-11-16T11:51:23+5:302025-11-16T11:52:46+5:30
बिग बॉस मराठी विजेता आणि बिग बॉस हिंदीचा रनर अप असलेल्या शिव ठाकरेचाही महाराष्ट्रीयन भाऊला पाठिंबा आहे. शिव ठाकरेने प्रणित मोरेसाठी खास पोस्ट केली आहे.

Bigg Boss 19: शिव ठाकरेचा 'महाराष्ट्रीयन भाऊ'ला फूल सपोर्ट! प्रणित मोरेसाठी केली पोस्ट, म्हणाला- "भाऊ..."
Bigg Boss 19: 'बिग बॉस १९' हे पर्व आता अंतिम टप्प्यात आलं आहे. लवकरच 'बिग बॉस १९'चा अंतिम सोहळा पार पडणार आहे. सध्या घरातील चर्चेत असलेल्या सदस्यांपैकी प्रणित मोरे एक आहे. प्रणितने 'बिग बॉस १९'च्या घरात एन्ट्री केल्यानंतर चाहत्यांना आश्चर्याचा धक्का बसला होता. सुरुवातीला प्रणित बिग बॉसच्या घरात फारसा दिसला नाही. पण, आता मात्र तो चांगला खेळत आहे. त्यामुळेच त्याला चाहते आणि सेलिब्रिटींचाही फूल सपोर्ट मिळत आहे.
बिग बॉस मराठी विजेता आणि बिग बॉस हिंदीचा रनर अप असलेल्या शिव ठाकरेचाही महाराष्ट्रीयन भाऊला पाठिंबा आहे. शिव ठाकरेने प्रणित मोरेसाठी खास पोस्ट केली आहे. या आठवड्यात प्रणित नॉमिनेटेड आहे. त्यामुळे त्याला व्होट करण्यासाठी शिव ठाकरेने चाहत्यांना आवाहन केलं आहे. शिव ठाकरेने त्याच्या इन्स्टाग्रामवर प्रणितला व्होट करण्यासाठी स्टोरी शेअर केली आहे. या स्टोरीमध्ये त्याने प्रणित मोरेला टॅग केलं आहे. भाऊ असं म्हणत त्याने हार्ट इमोजी पोस्ट केले आहेत.

प्रणितला अनेक मराठी कंटेट क्रिएटर्सचा पाठिंबाही मिळत आहे. आता प्रणित टॉप ५ मध्ये जागा मिळवू शकेल का, हे पाहावं लागेल. आता घरात प्रणितसह गौरव खन्ना, फरहाना, अश्नूर कौर, अमाल मलिक, कुनिका सदानंद, शहबाज, मालती चहर, तान्या मित्तल हे सदस्य आहेत. यापैकी आता बिग बॉसच्या ट्रॉफीवर कोण नाव कोरणार, हे पाहणं रंजनकारक असणार आहे.