"कपडे भाड्याने आणलेस का?", भावाने घरात एन्ट्री घेताच प्रणित मोरेचा प्रश्न, हसून हसून लोटपोट
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 20, 2025 11:17 IST2025-11-20T11:16:22+5:302025-11-20T11:17:04+5:30
बिग बॉसच्या घरातील एक व्हिडीओ समोर आला आहे. या व्हिडीओत प्रणितचा भाऊ प्रयाग घरात एन्ट्री घेत आहे. प्रणितचा भाऊ म्हणजे त्याचीच कॉपी आहे.

"कपडे भाड्याने आणलेस का?", भावाने घरात एन्ट्री घेताच प्रणित मोरेचा प्रश्न, हसून हसून लोटपोट
Bigg Boss 19: 'बिग बॉस १९'मध्ये हा आठवडा फॅमिली वीक म्हणून सेलिब्रेट केला जात आहे. या आठवड्यात स्पर्धकांच्या कुटुंबातील काही सदस्य त्यांना भेटायला बिग बॉसच्या घरात येणार आहेत. कुनिका सदानंदचा मुलगा आणि नाती, अश्नूर कौरचे वडील, फरहाना भटची आई आणि अमाल मलिकचा भाऊ अरमान मलिक यांच्यानंतर आता मराठमोळा कॉमेडियन प्रणित मोरेच्या भावाची बिग बॉसच्या घरात एन्ट्री झाली आहे.
बिग बॉसच्या घरातील एक व्हिडीओ समोर आला आहे. या व्हिडीओत प्रणितचा भाऊ प्रयाग घरात एन्ट्री घेत आहे. प्रणितचा भाऊ म्हणजे त्याचीच कॉपी आहे. दिसायला अगदी सेम असण्याबरोबरच त्याने घरात येताच प्रणितप्रमाणेच सदस्यांना रोस्ट केल्याचं व्हिडीओत पाहायला मिळत आहे. व्हिडीओच्या सुरुवातीला प्रणित बिग बॉसला विचारतो की कोण आहे? त्यानंतर बिग बॉस प्रणितला फ्रिज करतात. मग घरात त्याचा भाऊ प्रयागची एन्ट्री होते. घरात येताच प्रयाग घरातील सदस्यांबद्दल त्याच्या स्टाइलमध्ये कॉमेडी करत बोलत असल्याचं दिसत आहे.
प्रयाग म्हणतो,"बरं झालं बिग बॉसने फरहानाला फ्रिज केलं. घरात किती शांतात वाटतेय". प्रयाग असं म्हणताच घरातील सगळे हसायला लागतात. त्यानंतर प्रणित आणि प्रयाग एकमेकांची गळाभेट घेतात. प्रणित त्याच्या भावालाही सोडत नाही. प्रयागचे कपडे पाहून प्रणित म्हणतो, "कपडे कुठून भाड्याचे आणले का?". ते ऐकून सगळे हसायला लागतात. तान्या प्रयागकडे प्रणितची तक्रार करते की "याचे अर्धे जोक तर माझ्यावरच असतात". त्यावर प्रणितचा भाऊ मजेशीर उत्तर देतो. तो म्हणतो, "ज्याच्यावर मार्केटमध्ये जास्त किंमत आहे, त्याच्यावरच तो जोक मारणार ना".
व्हिडीओत पुढे दिसतंय की प्रयाग म्हणतो, "तुला बोअर झालं तर तू म्हणशील मी जीमला जाईन. ही म्हणेल मी स्विमिंग करते. फरहाना विचार करते मी बोअर झालीये काय करू... ऐ तू इकडे ये भांडण करुया". प्रयागच्या कॉमेडीनंतर घरातील सगळेच हसायला लागतात.