प्रणित मोरे आणि अभिषेकमध्ये पुन्हा मैत्री? बजाज म्हणाला "मी तर शत्रूंसोबत..."
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 11, 2025 10:08 IST2025-12-11T09:58:19+5:302025-12-11T10:08:56+5:30
वैर संपलं! प्रणित मोरे आणि अभिषेक बजाज पुन्हा बनले 'जीवलग मित्र'

प्रणित मोरे आणि अभिषेकमध्ये पुन्हा मैत्री? बजाज म्हणाला "मी तर शत्रूंसोबत..."
'बिग बॉस १९'चा ग्रँड फिनाले नुकताच पार पडला. टीव्हीचा सुपरस्टार गौरव खन्नाने 'बिग बॉस १९'ची ट्रॉफी त्याच्या नावावर केली. फरहाना भट्ट ही उपविजेती ठरली. तर मराठमोळ्या प्रणित मोरेला तिसऱ्या स्थानावर समाधान मानावं लागलं. यंदाचं बिग बॉसचं पर्व खऱ्या अर्थानं गाजलं. 'बिग बॉस'च्या घरात स्पर्धकांमध्ये झालेले वाद आणि भांडणे चर्चेत राहिले. त्यापैकीच एक प्रणित मोरे आणि अभिषेक बजाज यांच्यातील वाद. प्रणित मोरेमुळे अभिषेक बजाजला घराबाहेर जावे लागले होतं, त्यामुळे तो खेळातून बाहेर आल्यापासूनच प्रणितविषयी राग व्यक्त करत होता. तसेच अलिकडेच ग्रँड फिनालेचे फोटो शेअर करतानाही अभिषेकने प्रणितला क्रॉप केलं होतं. पण, या मोठ्या भांडणाला एक गोड ट्वीस्ट मिळाला आहे. प्रणित मोरे आणि अभिषेक बजाज यांच्यात पुन्हा मैत्री जुळली आहे.
'बिग बॉस १९'नंतर प्रणित आणि अभिषेक पहिल्यांदाच एकत्र दिसले. हे दोघेही त्यांच्यातला वाद मिटवून पुन्हा एकत्र आल्याचं पहायला मिळालं आहे. दोघांचे व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. दोघांनीही एकमेकांसोबत हात मिळवला, खांद्यावर हात टाकून पापाराझींना पोज दिल्या. व्हायरल व्हिडिओमध्ये प्रणित म्हणताना दिसतोय की, "मी बोललो होतो ना की, मी त्याची नाराजी दूर करेन". यावर अभिषेकने हसत हसत म्हटले, "शत्रूंसोबत हातमिळवणी केलीये, हा तर माझा भाऊच आहे". प्रणितने अभिषेकची समजूत नेमकी कशी काढली आणि त्यांच्यात पुन्हा समेट कसा झाला, हे अद्यापही गुलदस्त्यातच आहे. पण 'बिग बॉस'मधील हे दोन मित्र पुन्हा एकत्र आल्याने, त्यांच्या चाहत्यांना मात्र चांगलाच आनंद झाला आहे.
घरातून बाहेर पडल्यापासून अभिषेक होता नाराज
'बिग बॉस १९'च्या 'वीकेंड का वार'मध्ये प्रणित मोरेला काही विशेष अधिकार मिळाले होते. घरातील नॉमिनेटेड सदस्यांपैकी प्रणितला एकाला वाचवणं शक्य होतं. बॉटम ३ मध्ये असलेल्या सदस्यांपैकी प्रणितनं अशनूर कौरला सेफ केलं. त्यामुळं अभिषेक बजाज आणि नीलम गिरी दोघेही घराबाहेर आले. प्रणित आणि अभिषेकमध्ये नेहमीच चांगली मैत्री असल्याने प्रणितचा हा निर्णय सगळ्यांसाठीच धक्कादायक होता. अनेकांना वाटले की प्रणितने अभिषेकला 'गेम प्लॅन'चा भाग म्हणून बाहेर काढले.