Bigg Boss 19 Promo: तान्या मित्तल आणि नीलम गिरी यांची मैत्री तुटली, पुर्ण घर गेलं विरोधात, पाहा प्रोमो
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 23, 2025 13:58 IST2025-10-23T13:57:35+5:302025-10-23T13:58:28+5:30
Bigg Boss 19 Today Promo: नीलम गिरीसोबतची मैत्री तुटल्यानंतर संपूर्ण घर तान्याविरुद्ध उभे राहिले आहे.

Bigg Boss 19 Promo: तान्या मित्तल आणि नीलम गिरी यांची मैत्री तुटली, पुर्ण घर गेलं विरोधात, पाहा प्रोमो
'बिग बॉसच्या १९' व्या सीझनची दणक्यात सुरुवात झाली आहे. पहिल्या भागापासून हा शो विविध कारणांमुळे चर्चेत असतो. यंदाही हेच पाहायला मिळत आहे. ड्रामा, भांडणं आणि बदलत्या नात्यांमुळे प्रेक्षकांचे लक्ष शोकडे वेधले जात आहे. 'बिग बॉसच्या १९'च्या घरात तान्या मित्तल आणि निलम गिरी यांच्यात पहिल्या दिवसापासून घनिष्ठ मैत्री पाहायला मिळत होती. पण, आता त्यांच्या मैत्रीत दरी आली आहे. ज्यामुळे संपूर्ण घर तान्याविरुद्ध उभे राहिले आहे.
निर्मात्यांनी नुकत्याच जारी केलेल्या प्रोमोमध्ये तान्या मित्तल आणि नीलम गिरी यांच्यातील मैत्री तुटल्याचं पाहायला मिळालं. या तणावाचे कारण ठरली आहे, स्पर्धक फरहाना भट्ट. नीलमचे फरहानाशी भांडण झालं होतं. त्यामुळे ती तान्याला विचारते की, "ज्या व्यक्तीनं मला घरात सर्वात जास्त रडवलं, तिच्याशी तू का बोलत आहेस?". नीलमने हा प्रश्न उपस्थित करताच, घरातील इतर सदस्यांनीही तान्यावर निशाणा साधायला सुरुवात केली.
Neelam aur Tanya ke beech aayi daraar, gharwaale bhi ho gaye Tanya ke against! Ab kya karegi woh? 🤔
— JioHotstar Reality (@HotstarReality) October 23, 2025
Dekhiye #BiggBoss19 ka naya episode, har roz raat 9 baje #JioHotstar par aur 10:30 baje @colorstv par.
Watch Now:- https://t.co/XNlwzrEgyfpic.twitter.com/UkI76kkhAn
घरातील सदस्यांकडून सतत टोमणे आणि आरोप झाल्यानंतर तान्या मित्तलचा अखेर संयम सुटला. तिने ओरडून म्हटले की "मी रडत नाहीये आणि सर्वांच्या "कडू" टिप्पण्या शांतपणे ऐकत आहे". तिच्या या उद्रेकाने घरातील वातावरण अधिक तापले. हा प्रोमो पाहून काही चाहते खूप आनंदी झाले आहेत. नीलम गिरीने तान्या मित्तलचा "खोटारडेपणा" उघड करावा अशी त्यांची खूप दिवसांपासून इच्छा होती. या आठवड्यात तान्या या सगळ्या आरोपांना कशी सामोरे जाते, हे पाहणे उत्सुकतेचे ठरणार आहे.