'बिग बॉस १९' च्या घरात निघाला साप, 'या' स्पर्धकानं दाखवलं धाडस, सापाला पकडून बाटलीत टाकलं!
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 1, 2025 13:08 IST2025-10-01T13:04:08+5:302025-10-01T13:08:20+5:30
बिग बॉसच्या घरात मोठा साप फिरताना दिसून आला.

'बिग बॉस १९' च्या घरात निघाला साप, 'या' स्पर्धकानं दाखवलं धाडस, सापाला पकडून बाटलीत टाकलं!
Snake in BB House: सध्या 'बिग बॉस १९' सोशल मीडियावर चांगलाच चर्चेत आहे. वेगवेगळ्या कारणांमुळे हा सीझन चाहत्यांच्या पसंतीस उतरतोय. टास्कपेक्षाही इथे आलेल्या स्पर्धकांची वैयक्तिक आयुष्य आणि इथे होणारी भांडणं सोशल मीडियावर चर्चेत आहेत. आता बिग बॉसच्या घरात एक मोठी गडबड दिसून आली आहे. बिग बॉसच्या घरात साप दिसला.
'बिग बॉस' लेटेस्ट न्यूज' नुसार, स्पर्धक गौरव खन्ना याने सर्वप्रथम हा साप पाहिला, ज्यामुळे घरात लगेचच गोंधळाचे वातावरण निर्माण झाले. सुरक्षिततेसाठी बिग बॉसने तातडीने सर्व स्पर्धकांना बागेत जाण्याचे निर्देश दिले. या गोंधळात, शोमधील सर्वात मनोरंजक स्पर्धकांपैकी एक असलेल्या मृदुल तिवारीने मोठं धाडस दाखवलं. मृदुलने अजिबात वेळ न घालवता सापाला पकडले आणि त्याला एका बाटलीत बंद केले. मृदुलच्या या धाडसामुळे घरातील इतर सदस्य आश्चर्यचकित झाले.
यापूर्वीही 'बिग बॉस'च्या घरात साप दिसण्याची अफवा पसरली होती, पण शोच्या टीमने त्यावेळी तो व्हिडीओ बनावट असल्याचे स्पष्ट केले होते. मात्र, ताज्या घटनेचा कोणताही व्हिडीओ अद्याप अधिकृतपणे समोर आलेला नाही. या घटनेनंतर सोशल मीडियावर प्रेक्षकांच्या प्रतिक्रियांचा पूर आला आहे. अनेक चाहते मृदुलचे कौतुक करत आहेत.
८ स्पर्धक झाले नॉमिनेट
'बिग बॉस १९' बद्दल बोलायचं झाल्यास, या आठवड्यात आठ स्पर्धक नॉमिनेट झाले आहेत. नामांकित स्पर्धकांमध्ये अमाल, नेहल, कुनिका, अशनूर, नीलम, प्रणित मोरे, तान्या मित्तल आणि झीशान यांचा समावेश आहे. हे सगळे स्पर्धक आता घराबाहेर जाण्यासाठी नॉमिनेट झाले आहेत. तसेच, 'बिग बॉस १९'च्या गेल्या वीकेंड वॉरमध्ये आवेज दरबारला घरातून बाहेर काढण्यात आले होते. आता या आठवड्यात कोण बाहेर पडणार, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.