Bigg Boss 19: प्रणित मोरेला मराठी अभिनेत्याचा फूल सपोर्ट, म्हणाला- "आपला मराठी वाघ..."
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 26, 2025 13:35 IST2025-09-26T13:35:31+5:302025-09-26T13:35:50+5:30
सोशल मीडियावर प्रणितला त्याचे चाहते जोरदार सपोर्ट करत आहेत. तर काही मराठी कंटेट क्रिएटरही प्रणितला पाठींबा देत आहेत.

Bigg Boss 19: प्रणित मोरेला मराठी अभिनेत्याचा फूल सपोर्ट, म्हणाला- "आपला मराठी वाघ..."
Bigg Boss 19: 'बिग बॉस १९' हे पर्व अनेक कारणांमुळे चर्चेत आहे. यंदाच्या पर्वात मराठमोळा कॉमेडियन प्रणित मोरेही सहभागी झाला आहे. सध्या प्रणित अमाल मलिक आणि बसीर अली यांच्यासोबत झालेल्या वादामुळे चर्चेत आहे. बसीरने अमाल आणि प्रणित यांच्या वादात उडी घेतली. त्या दोघांनीही भांडणात प्रणितचा अपमान केला. त्यामुळे सोशल मीडियावर प्रणितला त्याचे चाहते जोरदार सपोर्ट करत आहेत. तर काही मराठी कंटेट क्रिएटरही प्रणितला पाठींबा देत आहेत.
आता मराठी अभिनेताअभिजीत केळकरनेही प्रणितला फूल सपोर्ट दिला आहे. या आठवड्यात प्रणित नॉमिनेट आहे. त्याला वोट करण्यासाठी अभिजीतने त्याच्या इन्स्टाग्रामवरुन पोस्ट शेअर केली आहे. "मी प्रणितला सपोर्ट करतो. आपला मराठी वाघ लढतोय, त्याला आपण नाहीतर कोण support करणार? मी vote केलंय, तुम्ही पण नक्की करा", असं म्हणत त्याने पोस्टमधून प्रणितला वोट करण्यासाठी चाहत्यांना आवाहन केलं आहे.
दरम्यान, या आठवड्यात दोन टीममध्ये नॉमिनेशन टास्क खेळवला गेला. यामध्ये जी टीम हरेल ते सदस्य थेट नॉमिनेट होणार होते. सिक्रेट रुममध्ये असलेल्या नेहालला हा अधिकार देण्यात आला होता. नेहालने प्रणितच्या टीमला नॉमिनेट केलं. आता प्रणित मोरे, गौरव खन्ना, मृदुल तिवारी, मिनल, आवेज दरबार, अश्नूर कौर यापैकी कोणाचा प्रवास संपणार, हे बघावं लागेल.