तान्या-अमाल मलिक-मालती; 'बिग बॉस'च्या घरात लव्ह ट्रँगल, एकमेकींवर होतोय नुसताच जळफळाट
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 30, 2025 16:03 IST2025-10-30T16:03:37+5:302025-10-30T16:03:57+5:30
मालतीने वाइल्ड कार्ड एन्ट्री घेतल्यानंतर अमालशी चांगली मैत्री केली होती. मात्र मालती आणि अमालची जवळीक पाहून तान्याचा जळफळाट होत आहे.

तान्या-अमाल मलिक-मालती; 'बिग बॉस'च्या घरात लव्ह ट्रँगल, एकमेकींवर होतोय नुसताच जळफळाट
Bigg Boss 19: 'बिग बॉस'चं घर म्हटलं तर तिथे लव्ह अँगल नसेल असं होणारच नाही. यंदाच्या सीझनमध्येही बिग बॉसच्या घरात काही जोड्यांमध्ये जवळीक वाढताना दिसत आहे. पहिल्या दिवसापासूनच तान्या मित्तल अमाल मलिकच्या पाठीमागे आहे. तिने ऑन कॅमेरादेखील अमालबद्दल काळजी आणि प्रेम व्यक्त केलेलं आहे. तर मालतीने वाइल्ड कार्ड एन्ट्री घेतल्यानंतर अमालशी चांगली मैत्री केली होती. मात्र मालती आणि अमालची जवळीक पाहून तान्याचा जळफळाट होत आहे.
बिग बॉसच्या घरातील एक व्हिडीओ समोर आला आहे. मालतीने अमालचं स्वेटशर्ट घातलेलं पाहून तान्याची चिडचिड झाली होती. तान्या म्हणाली होती की अमालशी चांगली फ्रेंडशिप असती तर तिला इकडेच स्वेटशर्ट काढायला लावून माफी मागियला लावली असती. मालतीने अमालचं स्वेटशर्ट घातल्याचा बदला आता तान्याने घेतला आहे. व्हिडीओत दिसतंय की मालतीने काढलेलं अमालचं स्वेटशर्ट तान्या घालत आहे. "हिला काहीही झालं तरी स्वेटशर्ट घालून द्यायचं नाही", असं ती म्हणत आहे.
तान्याने स्वेटशर्ट घातलेलं पाहून मालतीचा चेहरा पाहण्यासारखा झाला आहे. तान्या घरात अमालचं स्वेटशर्ट घालून फिरत असल्याचं पाहून घरातील सदस्यही आश्चर्यचकित झाल्याचं दिसत आहे. "ती माझ्याकडे कशी बघत होती पाहिलं का? तिला हे वाटलंच नसेल की तिच्या बॉक्समधून मी हे स्वेटशर्ट घेईन", असं तान्या म्हणते. "आता मला राग आलाय आता तान्या तू बघच", असं मालती म्हणताना दिसत आहे. आता या वरुन बिग बॉसच्या घरात नवा वाद होणार का? हे पाहावं लागेल.