Bigg Boss 19: "प्रणित मोरेपासून दूर राहा, तो...", घरात येताच गौरव खन्नाच्या पत्नीने भरले अभिनेत्याचे कान
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 18, 2025 12:53 IST2025-11-18T12:53:19+5:302025-11-18T12:53:49+5:30
बिग बॉसच्या घरात हा आठवडा फॅमिली वीक म्हणून सेलिब्रेट केला जाणार आहे. अभिनेता गौरव खन्नाची पत्नी त्याला भेटायला येणार आहे. घरात येताच गौरवच्या पत्नीने प्रणित मोरेविरोधात त्याचे कान भरले आहेत.

Bigg Boss 19: "प्रणित मोरेपासून दूर राहा, तो...", घरात येताच गौरव खन्नाच्या पत्नीने भरले अभिनेत्याचे कान
Bigg Boss 19: 'बिग बॉस १९' हे पर्व आता अंतिम टप्प्यात आलं आहे. या आठवड्यात घरातील सदस्यांना खास सरप्राइज मिळणार आहे. बिग बॉसच्या घरात हा आठवडा फॅमिली वीक म्हणून सेलिब्रेट केला जाणार आहे. या आठवड्यात घरातील सदस्यांचे कुटुंबीय त्यांना भेटायला बिग बॉस हाऊसमध्ये येणार आहेत. अभिनेता गौरव खन्नाची पत्नी त्याला भेटायला येणार आहे. घरात येताच गौरवच्या पत्नीने प्रणित मोरेविरोधात त्याचे कान भरले आहेत.
कुनिका सदानंदचा मुलगा आणि अश्नूर कौरच्या वडिलांनंतर आता बिग बॉसच्या घरात गौरवची पत्नी आकांक्षा चमोला एन्ट्री घेणार आहे. आकांक्षाला पाहून गौरव भावुक होत असल्याचं प्रोमोमध्ये पाहायला मिळतंय. आकांक्षा येताच गौरव पत्नीला मिठी मारतो. त्यानंतर आकांक्षा गौरवला प्रणित मोरेपासून दूर राहण्याचा सल्लाही देते. घरात येताच आकांक्षा गौरवला म्हणते, "प्रणितपासून दूर राहा. त्याने ज्याप्रकारे अभिषेक बजाजला धोका दिला मला अजिबात नाही आवडलं". बिग बॉसच्या येणाऱ्या भागात हे पाहायला मिळणार आहेत.
आकांक्षाने गौरवला असा सल्ला दिल्याने प्रणित मोरेचे चाहते नाराज झाले आहेत. पहिल्या दिवसापासूनच गौरव खन्ना, प्रणित मोरे, मृदुल तिवारी, अभिषेक बजाज आणि अश्नूर कौर यांच्यात चांगली मैत्री होती. मृदुल आणि अभिषेक घराबाहेर पडल्यानंतर आता प्रणित, अश्नूर आणि गौरवच्या मैत्रीतही फूट पडत असल्याचं दिसत आहे. आता आकांक्षाने सल्ला दिल्यानंतर गौरव आणि प्रणितच्या मैत्रीची समीकरणं बदलणार का, हे पाहावं लागेल.