"माझ्या वडिलांचं एक्स्ट्रा मॅरिटल अफेअर...", 'बिग बॉस'च्या घरात अभिनेत्रीचा मोठा खुलासा, म्हणाली- "मी त्यांना..."
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 1, 2025 11:07 IST2025-10-01T11:07:04+5:302025-10-01T11:07:53+5:30
फरहानाने खुलासा केला की तिने तिच्या वडिलांना पाहिलंदेखील नाही किंवा ती कधी तिच्या वडिलांना भेटलेली नाही.

"माझ्या वडिलांचं एक्स्ट्रा मॅरिटल अफेअर...", 'बिग बॉस'च्या घरात अभिनेत्रीचा मोठा खुलासा, म्हणाली- "मी त्यांना..."
Bigg Boss 19: 'बिग बॉस'च्या घरात स्पर्धक त्यांच्या वैयक्तिक आयुष्याबाबत अनेक खुलासे करताना दिसतात. यंदाच्या पर्वात सहभागी झालेली अभिनेत्री फरहाना भट हिनेदेखील तिच्या आयुष्याबाबत मोठा खुलासा केला आहे. 'बिग बॉस'च्या घरात बेडरुममध्ये कुनिका सदानंदसोबत फरहाना बोलत होती. यावेळी तिने तिच्या वडिलांबद्दल भाष्य केलं.
फरहानाने खुलासा केला की तिने तिच्या वडिलांना पाहिलंदेखील नाही किंवा ती कधी तिच्या वडिलांना भेटलेली नाही. कुनिकाशी बोलताना फरहाना म्हणाली, "माझे आईबाबा विभक्त झाले. माझ्या वडिलांनी दुसरं लग्न केलं. त्यांचं एक्स्ट्रा मॅरिटल अफेअर सुरू होतं. म्हणून माझी आई त्यांच्यापासून वेगळी झाली. तेव्हा ती फक्त २५-२६ वर्षांची असेल. मी माझ्या वडिलांना कधीच भेटलेले नाही. मी त्यांना पाहिलंदेखील नाही. फक्त फोटोमध्ये मी त्यांना पाहिलं आहे".
कुनिकाने फरहानाला विचारलं की तिच्या वडिलांना कधी तिला भेटण्याचा प्रयत्न केला नाही का? यावर फरहाना म्हणाली, "त्यांनी प्रयत्न केला होता पण माझ्या आईने त्यांना मनाई केली. माझी आई कोर्टात केस लढत होती". त्यावर कुनिकानेही तिच्या घटस्फोटाबद्दल भाष्य केलं. कुनिका म्हणाली, "२०व्या वर्षी माझा घटस्फोट झाला. मुलासाठी मी ९ वर्ष कोर्टात लढत होते. मुंबईत काम करायचे आणि केससाठी दिल्लीत ज्यायचे. शेवटी मुलगा म्हणाला की कोणीतरी थांबा नाहीतर माझं शिक्षण अर्धवट राहील. मग मी माघार घेतली".