Bigg Boss 19 Elimination: मोठा ट्विस्ट! एका स्पर्धकाची Exit, तर दुसऱ्याची धमाकेदार Entry
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 6, 2025 15:04 IST2025-11-06T15:04:34+5:302025-11-06T15:04:52+5:30
पाच लाखांहून अधिक फॉलोअर्स असूनही 'या' स्पर्धकाची होणार एक्झिट

Bigg Boss 19 Elimination: मोठा ट्विस्ट! एका स्पर्धकाची Exit, तर दुसऱ्याची धमाकेदार Entry
वादग्रस्त रिॲलिटी शो 'बिग बॉस सीझन १९' गेल्या अडीच महिन्यांपासून प्रेक्षकांचे जोरदार मनोरंजन करत आहे. घरातील बदलती समीकरणे, भांडणे आणि धक्कादायक निर्णय यामुळे हा शो नेहमीच चर्चेत असतो. झीशान कादरी, बसीर अली आणि नेहल चुडासमा यांसारख्या लोकप्रिय स्पर्धकांना बाहेर काढल्यानंतर, आता चाहत्यांना आणखी एक मोठा धक्का बसला आहे. या आठवड्यातील एलिमिनेशनबाबत एक मोठी अपडेट समोर आली आहे.
गेल्या आठवड्यात अभिषेक बजाज, अशनूर कौर, फरहाना भट्ट, गौरव खन्ना आणि नीलम गिरी (Neelam Giri) या पाच स्पर्धकांना एलिमिनेशनसाठी नॉमिनेट करण्यात आले होते. वृत्तानुसार, या आठवड्यात कमी मतांमुळे नीलम गिरी हिला शोमधून बाहेर काढण्यात आले आहे.
नीलम गिरीचे सोशल मीडियावर साडेपाच लाखांहून अधिक चाहते आहेत. तिला वाचवण्यासाठी घरातील अनेक स्पर्धक एकत्र आले होते. तरीही ती या आठवड्यात टिकू शकली नाही. कमी मतांमुळे तिला शो सोडावा लागला असल्याचे सांगितले जात आहे. नीलम गिरीला बाहेर काढल्याची ही माहिती बिग बॉसच्या फॅन पेजेसकडून दिली जात आहे. एलिमिनेशनबद्दल अधिकृत माहिती रविवारी 'वीकेंड का वार' दरम्यान समोर येईल.

'महाराष्ट्रीयन भाऊ' परतणार
एका बाजूला नीलम गिरीला बाहेरचा रस्ता दाखवण्यात आला असला तरी, दुसरीकडे चाहत्यांसाठी एक आनंदाची बातमी आहे. आरोग्याच्या कारणामुळे शोमधून बाहेर पडलेला एक स्पर्धक पुन्हा घरात दमदार पुनःप्रवेश करणार आहे. डेंग्यूचे निदान झाल्यामुळे गेल्या आठवड्यात शोमधून बाहेर काढण्यात आलेला स्पर्धक प्रणित मोरे आता घरात परतणार आहे. वैद्यकीय उपचारांसाठी बाहेर गेलेला 'महाराष्ट्रीयन भाऊ' आता पूर्णपणे बरा झाला आहे आणि वैद्यकीय परवानगी मिळाल्यानंतर तो पुन्हा एकदा घरात आपला खेळ खेळण्यासाठी सज्ज झाला आहे. नीलम गिरीच्या एलिमिनेशनमुळे चाहते निराश झाले असले तरी, प्रणित मोरेच्या पुनरागमनाची बातमी त्यांना नक्कीच दिलासा देणारी आहे.