रंगावरुन प्रणित मोरेला हिणवायचे लोक, 'बिग बॉस'च्या घरात कॉमेडियनचा खुलासा, म्हणाला- "शाळेत आणि कॉलेजमध्ये..."
By कोमल खांबे | Updated: November 11, 2025 15:44 IST2025-11-11T15:44:27+5:302025-11-11T15:44:51+5:30
लहानपणी प्रणितला वर्णभेदाचा सामना करावा लागला होता. त्याच्या रंगावरून लोक त्याला हिणवायचे. यामुळे त्याच्यात आत्मविश्वासही नव्हता. बिग बॉसच्या घरात अश्नूरशी बोलताना प्रणितने याबद्दल पहिल्यांदाच भाष्य केलं आहे.

रंगावरुन प्रणित मोरेला हिणवायचे लोक, 'बिग बॉस'च्या घरात कॉमेडियनचा खुलासा, म्हणाला- "शाळेत आणि कॉलेजमध्ये..."
Bigg Boss 19: 'बिग बॉस १९'मध्ये मराठमोळा कॉमेडियन प्रणित मोरे प्रेक्षकांची मनं जिंकून घेत आहे. प्रणितला चाहत्यांचाही फूल सपोर्ट मिळत आहे. आपल्या कॉमेडी स्टाइलने प्रेक्षकांचं मनोरंजन करत प्रणितने स्टँडअप कॉमेडियन म्हणून स्वत:ची ओळख निर्माण केली. पण लहानपणी प्रणितला वर्णभेदाचा सामना करावा लागला होता. त्याच्या रंगावरून लोक त्याला हिणवायचे. यामुळे त्याच्यात आत्मविश्वासही नव्हता. बिग बॉसच्या घरात अश्नूरशी बोलताना प्रणितने याबद्दल पहिल्यांदाच भाष्य केलं आहे.
प्रणित म्हणाला, "मी लहान होतो तेव्हा मला नेहमी लोक तू काळा आहेस, असं बोलायचे. सगळे मला चिडवायचे. तेव्हा मला खूप वाईट वाटायचं. पण या गोष्टी तर माझ्या हातातही नव्हत्या. त्यामुळे माझ्या रंगावरुन लोक मला का बोलत आहेत, हे कळत नव्हतं. त्यामुळेच शोमध्येही मी कधीच कोणाला बॉडी शेमिंग किंवा चुकीचं काही बोलत नाही. कारण मला माहितीये या गोष्टी मनाला किती लागतात. शाळेत, कॉलेजमध्येही मला कॉन्फिडन्स नव्हता. मला इंग्लिशही बोलता येत नव्हतं. त्यामुळे लोक तर तुम्हाला असंच दाखवतात की तुला इंग्लिश येत नाही तर तुला काहीच येत नाहीये".
"माझ्या दिसण्यावरुन तर मला बोललं जायचं. जर मी कॉमेडी केली नसती, माझ्याकडे ह्युमर नसतं, तर मी काय केलं असतं? जेव्हा मला हे कळलं की जर मी यांना काहीच बोललो नाही. तर हे शांत बसणार नाहीत. त्यामुळे ते मला बोलायच्या आधीच मी त्यांना असं काहीतरी बोलायचो जे त्यांना हर्ट होईल. पण, नंतर मला कळलं की मी वेगळं काय करतोय. मी पण तर त्यांच्यासारखंच वागतोय", असंही प्रणितने सांगितलं.