'बिग बॉस १९'मधून आवेज दरबार OUT, बाहेर आल्यावर पहिल्यांदाच शेअर केली पोस्ट; म्हणाला...
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 29, 2025 17:11 IST2025-09-29T17:10:34+5:302025-09-29T17:11:25+5:30
आवेजने सोशल मीडियावर लिहिला अनुभव

'बिग बॉस १९'मधून आवेज दरबार OUT, बाहेर आल्यावर पहिल्यांदाच शेअर केली पोस्ट; म्हणाला...
'बिग बॉस १९'मधून नुकताच आवेज दरबार बाहेर पडला. सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर आवेज दरबारला अनेकांनी पाठिंबा दिला होता. मात्र वोट्स कमी मिळाल्याने त्याला घराबाहेर जावं लागलं. त्याच्या एविक्शनमुळे घरातील सर्वच सदस्यांना धक्का बसला. आता आवेजने सोशल मीडियावर पोस्ट करत भावना व्यक्त केल्या आहेत. घरातून बाहेर पडल्यावर ही त्याची पहिलीच प्रतिक्रिया आहे.
आवेर दरबारने 'बिग बॉस १९'च्या 'वीकेंड का वार'चा व्हिडिओ शेअर केला. यामध्ये होस्ट सलमान खान अशनूर कौर, प्रणित मोरे आणि आवेज दरबारला दरवाजाच्या मागे जायला सांगतात. यानंतर प्रणित आणि अशनूर दोघेच पुन्हा घरात येतात. आणि आवेज बाहेर होतो. हे पाहून त्याचे खास मित्र मृदुल तिवारी आणि अभिषेक बजाजला धक्का बसतो.
आवेज म्हणतो, "बिग बॉसचा प्रवास इतक्या लवकर संपेल हा विचार केला नव्हता. एवढ्या कमी वेळातही इतके छान मित्र झाले. जणू ते घर आपलंच वाटायला लागलं होतं. प्रत्येक वीकेंडला सलमान खान सरांना भेटणं, एकत्र राहणं, गप्पा मारणं, मजा मस्ती हे सगळंच खूप आठवत राहील."
तो लिहितो, "मला प्रेम दिल्याबद्दल आभार. मी माझ्या मित्रांना भेटू शकलो नाही आणि त्यांना शुभेच्छा देऊ शकलो नाही याचं फक्त दु:ख आहे. पण त्यांच्यासोबत माझ्या शुभेच्छा कायमच राहतील. बिग बॉसचा प्रवास संपला असला तरी या आठवणी मनात कायम राहतील. जे सर्वोत्कृष्ट आहेत तेच जिंकू देत."
आवेज दरबार आणि गर्लफ्रेंड नगमा एकत्रच या शोमध्ये सहभागी झाले होते. नगमाचं याआधीच एविक्शन झालं होतं. नगमा गेल्यानंतर आवेजचा खेळ थोडा चांगला झाला होता. त्याची वहिनी गौहर खानही बिग बॉसमध्ये आली होती आणि तिने त्याला सल्ला दिला होता. पण प्रेक्षकांना आवेजला संधी द्यायची नव्हती. यामुळे तो आऊट झाला.