Bigg Boss 19: 'बिग बॉस'कडून अमाल मलिकला खास सरप्राइज, भाऊ अरमानची घरात एन्ट्री, व्हिडीओ पाहून डोळ्यात येईल पाणी
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 19, 2025 16:07 IST2025-11-19T16:06:32+5:302025-11-19T16:07:37+5:30
'बिग बॉस'च्या घरातून नवा प्रोमो समोर आला आहे. बिग बॉसकडून अमालला खास सरप्राइज मिळणार आहे. अमालला भेटायला त्याचा भाऊ अरमान येत असल्याचं व्हिडीओ दिसत आहे.

Bigg Boss 19: 'बिग बॉस'कडून अमाल मलिकला खास सरप्राइज, भाऊ अरमानची घरात एन्ट्री, व्हिडीओ पाहून डोळ्यात येईल पाणी
Bigg Boss 19: 'बिग बॉस १९'मध्ये हा आठवडा हा फॅमिली वीक म्हणून सेलिब्रेट केला जात आहे. या आठवड्यात घरातील सदस्यांना भेटायला त्यांचे कुटुंबीय येणार आहेत. आठवड्याच्या सुरुवातीला कुनिका सदानंदचा मुलगा आणि अश्नूर कौरच्या वडिलांनी घरात हजेरी लावली. त्यानंतर फरहाना भटची आईही लेकीला भेटण्यासाठी घरात आली. आता अमाल मलिकचा भाऊ आणि प्रसिद्ध बॉलिवूड सिंगर अरमान मलिक याची बिग बॉसच्या घरात एन्ट्री होणार आहे.
'बिग बॉस'च्या घरातून नवा प्रोमो समोर आला आहे. बिग बॉसकडून अमालला खास सरप्राइज मिळणार आहे. अमालला भेटायला त्याचा भाऊ अरमान येत असल्याचं व्हिडीओ दिसत आहे. अरमान "कौन तुझे यू प्यार करेगा, जैसे मे करता हू" हे गाणं बोलत बिग बॉसच्या घरात एन्ट्री घेतो. गार्डन एरियामध्ये बसलेल्या अमालला अरमान मिठी मारतो. त्यानंतर अमालला अश्रू अनावर झाल्याचं दिसत आहे. बिग बॉसच्या घरातील हा व्हिडीओ पाहून चाहतेही भावुक झाले आहेत.
'बिग बॉस १९' हा सीझन आता अंतिम टप्प्यात आला आहे. सीझन संपायला आता काहीच आठवडे बाकी राहिले आहेत. स्पर्धेत टिकून राहण्यासाठी घरातील सदस्य शर्थीचे प्रयत्न करताना दिसत आहेत. लवकरच 'बिग बॉस १९'चा महाअंतिम सोहळा पार पडणार आहे. मालती चहर, प्रणित मोरे, गौरव खन्ना, अमाल मलिक, फरहाना भट, कुनिका सदानंद, शहबाज, अश्नूर कौर, तान्या मित्तल यापैकी कोण 'बिग बॉस १९'च्या ट्रॉफीवर नाव कोरणार हे पाहणं रंजनकारक असणार आहे.