"प्रणित तू माझ्यावर पण जोक केलास का?", अजय देवगणचा प्रश्न, कॉमेडियन म्हणाला- "सर, तुम्ही तर..."
By कोमल खांबे | Updated: November 9, 2025 13:33 IST2025-11-09T13:32:56+5:302025-11-09T13:33:23+5:30
'बिग बॉस १९'मधून प्रणित मोरेला प्रकृतीच्या कारणास्तव एक्झिट घ्यावी लागली होती. मात्र, त्यानंतर काही दिवसांनी आता प्रणितची पुन्हा बिग बॉसच्या घरात एन्ट्री झाली आहे.

"प्रणित तू माझ्यावर पण जोक केलास का?", अजय देवगणचा प्रश्न, कॉमेडियन म्हणाला- "सर, तुम्ही तर..."
Bigg Boss 19 : 'बिग बॉस १९'मधून प्रणित मोरेला प्रकृतीच्या कारणास्तव एक्झिट घ्यावी लागली होती. मात्र, त्यानंतर काही दिवसांनी आता प्रणितची पुन्हा बिग बॉसच्या घरात एन्ट्री झाली आहे. प्रणित ठणठणीत बरा होऊन बिग बॉसच्या घरात परतला आहे. बिग बॉसच्या घरात एन्ट्री होताच घरातील सदस्यांसोबत चाहतेही आता खूश झाले आहेत. बिग बॉसच्या यंदाच्या वीकेंड का वारचा नवा प्रोमो समोर आला आहे.
आज बिग बॉसमध्ये 'दे दे प्यार दे २' सिनेमाची टीम येणार आहे. अजय देवगण, रकुलप्रीत सिंग, आर माधवन आणि मीझान जाफरी हे सेलिब्रिटी वीकेंड का वारमध्ये हजेरी लावणार आहेत. याचा प्रोमो व्हिडीओ समोर आला आहे. यामध्ये अजय देवगण प्रणित मोरेला विचारतो, "प्रणित तू माझ्यावर पण जोक मारलास का?". तेव्हा प्रणित म्हणतो की, "नाही सर, तुमच्यावर जोक नाही मारला. तुम्हाला मी खूप मानतो". ते ऐकून सलमान आश्चर्यचकित होत असल्याचं दिसत आहे. मग प्रणित म्हणतो की "सलमान सर मला तसं म्हणायचं नव्हतं". घरातील सदस्यही हसायला लागतात.
प्रणितने त्याच्या कॉमेडी शोमध्ये अनेक सेलिब्रिटींवर विनोद केले आहेत. बिग बॉसमध्ये आल्यानंतर सलमानने प्रणितला त्याच्यावर केलेल्या जोकमुळे सुनावलं होतं. प्रणित हा खूप लोकप्रिय मराठमोळा कॉमेडियन आहे. त्याच्या शोलाही लोक गर्दी करतात. प्रणितचा चाहता वर्ग प्रचंड मोठा असून बिग बॉसमध्ये त्याला चाहत्यांचा पाठिंबा मिळताना दिसत आहे.