"प्रणितसाठी मी प्रायोरिटी होतो, पण वेळ आल्यावर...", 'बिग बॉस'मधून बाहेर पडलेल्या अभिषेक बजाजची प्रतिक्रिया
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 11, 2025 12:40 IST2025-11-11T12:39:14+5:302025-11-11T12:40:18+5:30
अभिषेक बाहेर गेल्याने प्रणित, अश्नूर, गौरव सगळ्यांनाच अश्रू अनावर झाले. आता घरातून बाहेर आल्यावर यावर अभिषेकने प्रतिक्रिया दिली आहे.

"प्रणितसाठी मी प्रायोरिटी होतो, पण वेळ आल्यावर...", 'बिग बॉस'मधून बाहेर पडलेल्या अभिषेक बजाजची प्रतिक्रिया
Bigg Boss 19: 'बिग बॉस'मध्ये गेल्या आठवड्यात डबल एलिमिनेशन पार पडलं. नीलम गिरी आणि अभिषेक बजाज यांनी बिग बॉसच्या घराचा निरोप घेतला. गेल्या आठवड्यात कॅप्टन असलेल्या प्रणित मोरेला बिग बॉसने विशेष अधिकार दिले होते. अश्नूर कौर, अभिषेक बजाज आणि नीलम गिरी यांच्यापैकी एकाला सेव्ह करायचा अधिकार प्रणितला देण्यात आला होता. प्रणित अभिषेक आणि अश्नूर पैकी कोणा एकाचं नाव घेईल, हे गृहित धरलं होतं. प्रणितने अश्नूरचं नाव घेतलं. त्यामुळे अभिषेक आणि नीलमला घरातून एक्झिट घ्यावी लागली.
या निर्णयानंतर घरातील सगळ्यांनाच मोठा धक्का बसला. अभिषेक बाहेर गेल्याने प्रणित, अश्नूर, गौरव सगळ्यांनाच अश्रू अनावर झाले. आता घरातून बाहेर आल्यावर यावर अभिषेकने प्रतिक्रिया दिली आहे. प्रणितच्या निर्णयावर अभिषेक म्हणाला, "प्रणितला कोणाला तरी एकाला निवडावं लागणारच होतं. त्याला तशा परिस्थितीत टाकलं होतं. अश्नूरचा गेमही चांगलाच आहे. दोघांमधलं कोणीतरी एक जाणार होतं. त्यामुळे मी इमोशनल झालो होतो. हे तर कन्फर्म होतं. त्यामुळे मला वाईट वाटत होतं. कारण, काही लोक आमची जोडी तोडण्याचा प्रयत्न करत होते आणि त्यांनी ते साध्य केलं".
"प्रणित मला नेहमी म्हणायचा की तू माझी फर्स्ट प्रायोरिटी आहेस. मी त्याला नेहमी दुसऱ्या स्थानावर ठेवलं होतं. पण, जेव्हा चान्स मिळाला, तेव्हा त्याला जाणवलं असेल की हीच योग्य वेळ आहे. पण, मी म्हणेन की भाई प्लेअर आहे", असंही पुढे अभिषेक म्हणाला.