बिश्नोईच्या धमकीनंतर सलमानचा पहिला वीकेंड का वार! सदस्यांची घेतली शाळा, प्रोमो समोर
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 19, 2024 13:34 IST2024-10-19T13:31:05+5:302024-10-19T13:34:32+5:30
बिश्नोई गँगकडून धमक्या मिळाल्यानंतर सलमान बिग बॉसचं शूट करणार की नाही? असा प्रश्न चाहत्यांना पडला होता. पण, आता वीकेंड का वारचा प्रोमो समोर आला आहे.

बिश्नोईच्या धमकीनंतर सलमानचा पहिला वीकेंड का वार! सदस्यांची घेतली शाळा, प्रोमो समोर
Bigg Boss 18 : बॉलिवूड अभिनेता सलमान खानला लॉरेन्स बिश्नोईकडून वारंवार जीवे मारण्याची धमकी मिळत आहे. राष्ट्रवादी अजित पवार गटाचे नेते बाबा सिद्दिकींच्या हत्येनंतर पुन्हा सलमानला बिश्नोई गँगकडून धमकी मिळाली आहे. त्यामुळे सलमानच्या सुरक्षेततही वाढ करण्यात आली आहे. बिश्नोई गँगकडून धमक्या मिळाल्यानंतर सलमान बिग बॉसचं शूट करणार की नाही? असा प्रश्न चाहत्यांना पडला होता. पण, आता वीकेंड का वारचा प्रोमो समोर आला आहे.
कलर्सच्या ऑफिशियल अकाऊंटवरुन बिग बॉस १८च्या वीकेंड का वारचा प्रोमो शेअर करण्यात आला आहे. यामध्ये सलमान खान घरातील सदस्यांची शाळा घेताना दिसत आहे. या प्रोमोमध्ये सलमान अविनाश मिश्रावरुन घरातील सदस्यांना खडे बोल सुनावत असल्याचं दिसत आहे. सलमान म्हणतो, "अविनाश मिश्राबरोबर मुली सुरक्षित नाहीत, असं तुम्ही म्हणत आहात. अविनाशवर एवढा मोठा आरोप होत आहे. त्याच्या घरातील लोकांना काय वाटत असेल. माझे आईवडिलही यातून गेले आहेत. माझ्यावरही अनेक आरोप झाले आहेत". यामधून सलमानने अप्रत्यक्षरित्या
१२ ऑक्टोबरला बाबा सिद्दिकींची हत्या झाल्यानंतर सलमानने बिग बॉसचं शूटिंग थांबवलं होतं. शूटिंग कॅन्सल करून सलमान थेट बाबा सिद्दिकींना बघायला थेट हॉस्पिटलमध्ये पोहोचला होता. सिद्दिकींच्या हत्येनंतर धमकी आल्याने सलमान बिग बॉसचं शूटिंग करणार का नाही, याबाबत चाहते संभ्रमात होते. पण, आता मात्र त्याला पाहण्यासाठी चाहते उत्सुक आहेत.
बिग बॉसच्या शूटिंग दरम्यान सलमानसाठी कडक बंदोबस्त करण्यात आला होता. शूटिंग दरम्यान कोणालाही त्या परिसरात थांबता येणार नाही, अशी सक्त ताकीद दिली गेली होती. त्याबरोबरच तब्बल ६० सिक्युरिटी गार्ड बिग बॉसच्या सेटवर होते.