Bigg Boss 18 Grand Finale ची उत्सुकता शिगेला, स्पर्धकांचा होणार ग्रँड परफॉर्मन्स

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 19, 2025 17:53 IST2025-01-19T17:53:28+5:302025-01-19T17:53:35+5:30

निर्मात्यांनी ग्रँड फिनालेचे काही प्रोमो व्हिडीओ जारी केले आहेत. ज्यामध्ये स्पर्धक दमदार परफॉर्मन्स करताना दिसत आहेत.

Bigg Boss 18 Grand Finale Update Voting Result Vivian Dsena Rajat Dalal Karanveer Mehra Winner Prize | Bigg Boss 18 Grand Finale ची उत्सुकता शिगेला, स्पर्धकांचा होणार ग्रँड परफॉर्मन्स

Bigg Boss 18 Grand Finale ची उत्सुकता शिगेला, स्पर्धकांचा होणार ग्रँड परफॉर्मन्स

Bigg Boss १८ Grand Finale: 'बिग बॉस' हा छोट्या पडद्यावरील लोकप्रिय व वादग्रस्त रिअ‍ॅलिटी शो आहे.  आज १९ जानेवारी रोजी १८ व्या पर्वाचा शेवटचा दिवस आहे. अभिनेता विवियन डिसेना, करणवीर मेहरा, ईशा सिंग, अविनाश मिश्रा,  चुम दरंग आणि रजत दलाल हे स्पर्धक या शोच्या ग्रँड फिनालेमध्ये पोहोचले आहेत. दरवेळीप्रमाणे यंदाही बॉलिवूड सुपरस्टार सलमान खान ग्रँड फिनालेचं होस्टिग करणार आहे. 

 आज संध्याकाळी 6 ते मध्यरात्री 12 या वेळेत 'बिग बॉस'च्या ग्रॅंड फिनालेची ग्रँड पार्टी होणार आहे. अक्षय कुमार हा 'स्काय फोर्स' या चित्रपटाच्या प्रमोशनसाठी 'बिग बॉस १८' च्या ग्रँड फिनालेमध्ये येणार आहे. तर  'लव्हयापा' चित्रपटाच्या प्रमोशनसाठी आमिर खानचा मुलगा जुनैद खान आणि खुशी कपूरदेखील सहभागी होणार आहेत. 


निर्मात्यांनी ग्रँड फिनालेचे काही प्रोमो व्हिडीओ जारी केले आहेत. ज्यामध्ये स्पर्धक दमदार परफॉर्मन्स करताना दिसत आहेत. करणवीर मेहरा आणि चुम दारंग हे शाहिद कपूरच्या 'तेरी बातों में ऐसा उल्झा जिया' गाण्यावर रोमँटिक डान्स करणार आहेत. तर रजत दलाल आणि चाहत पांडे यांचा परफॉर्मन्स असणार आहे. दोघेही गोविंदाच्या 'तुम तो धोकेबाज हो' या गाण्यावर परफॉर्म करताना पाहायला मिळतील. 



'बिग बॉस १८'चा प्रिमियर हा ६ ऑक्टोबर २०२४ रोजी प्रसारित झाला. या सीझनमध्ये १८ स्पर्धकांनी भाग घेतला होता. हे स्पर्धक म्हणजे चुम दरंग, मुस्कान, शिल्पा शिरोडकर, नायरा बॅनर्जी, अविनाश मिश्रा, करणवीर मेहरा, एलिस कौशिक, सारा खान, अरफीन खान, हेमलता शर्मा, चाहत पांडे, श्रुतिका अर्जुन राज, तेजिंदर पाल सिंग बग्गा, गुणरत्न सदावर्ते, विवियन दसेना, शहजादा धामी, ईशा सिंग आणि रजत दलाल. तर  काही स्पर्धकांना 'बिग बॉस'मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्रीही मिळाली होती. सर्वप्रथम, दिग्विजय राठी आणि कशिश कपूर यांनी प्रवेश केला. यानंतर एडन रोज, यामिनी मल्होत्रा ​​आणि अदिती मिस्त्री यांनी एन्ट्री घेतली. आता शोमध्ये फक्त ६ स्पर्धक उरले आहेत, ज्यांनी अंतिम फेरीत आपले स्थान निश्चित केलं आहे. जे बिग बॉस ट्रॉफी जिंकण्याचा प्रयत्नात आहेत. 


'बिग बाॅस १८'च्या बक्षीस रकमेबद्दल बोलताना मीडिया रिपोर्ट्सनुसार, या सीझनच्या विजेत्याला आकर्षक ट्रॉफीसह सुमारे ४०ते ५० लाख रुपयांचा चेक दिला जाऊ शकतो. सध्या सोशल मीडियावर सुरू असलेल्या ट्रेंडनुसार, रजत दलाल आणि विवियन डिसेना या दोघांपैकी एक जाण 'बिग बाॅस १८'ची ट्रॉफी जिंकू शकते, असा अंदाज चाहते लावत आहेत.

Web Title: Bigg Boss 18 Grand Finale Update Voting Result Vivian Dsena Rajat Dalal Karanveer Mehra Winner Prize

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.