Bigg Boss 17: "मी तुझा गुलाम नाही..", अंकिता लोखंडेवर भडकला पती विकी जैन
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 24, 2023 12:45 IST2023-10-24T12:37:00+5:302023-10-24T12:45:04+5:30
अंकिताने पती विकी जैनसह 'बिग बॉस'च्या घरात मोठ्या दिमाखात एन्ट्री घेतली. पण, घरात जाताच पती-पत्नीत खटके उडत असल्याचं दिसत आहे.

Bigg Boss 17: "मी तुझा गुलाम नाही..", अंकिता लोखंडेवर भडकला पती विकी जैन
'बिग बॉस हिंदी'च्या नव्या पर्वाला गेल्या आठवड्यापासून सुरुवात झाली. 'बिग बॉस १७'मध्ये मराठमोळी अभिनेत्री अंकिता लोखंडेही सहभागी झाली आहे. अंकिताने पती विकी जैनसह 'बिग बॉस'च्या घरात मोठ्या दिमाखात एन्ट्री घेतली. पण, घरात जाताच पती-पत्नीत खटके उडत असल्याचं दिसत आहे. अंकिता अनेकदा विकीची तक्रार करताना दिसतेय. 'बिग बॉस'च्या घरातील अंकिता आणि विकीचा एक व्हिडिओ समोर आला आहे यात दोघांचे जोरदार भांडण झाल्याचं दिसतेय.
अंकिता आणि विकी बेडवर बोलत होते. अंकिता विकीला सांगते की तो खेळ खूप चांगला खेळत आहे पण तो तिला खेळात साथ देत नाही आणि त्यामुळे तिला एकटेपणा वाटत आहे.
अंकिताचे बोलणे ऐकून विकीचा राग अनावर होतो. रागावतो आणि म्हणतो – मी तुझा गुलाम नाही आणि माझ्यानुसार खेळणार. पुढे तो म्हणतो, असं करुया एकमेकांपासून दूर राहुया बोलुया सुद्धा नको. विकीचे बोलणे ऐकून अंकिताला रडू कोसळत.
विकी अंकिताला प्रेमाने आणि आदराने बोलण्यास सांगतो, कारण तो म्हणतो त्याने नेहमीच त्याला पाठिंबा दिला आहे आणि तो तिचा गुलाम नाही आहे. अंकिता तिचा गेम तिला हवा तसा खेळू शकते. विकीचं हे बोलणं ऐकून अंकिताला रडायला येते आणि ती म्हणते की ती या घरात राहू शकत नाही.
'पवित्रा रिश्ता' मालिकेतून घराघरात पोहोचलेल्या अंकिताने चित्रपटांतही काम केलं आहे. आता 'बिग बॉस १७'मध्ये टिकून राहण्यासाठी अंकिता कोणते डावपेच खेळणार, हे पाहावं लागेल. अंकिताने २०२१मध्ये व्यावसायिक असलेल्या विकी जैनबरोबर लग्नगाठ बांधली. विकी आणि अंकिता सोशल मीडियावर एकमेकांबरोबरचे फोटो शेअर करताना दिसतात.