अखेर सलमान खान आणि तब्बूने सांगितलं कधी करणार लग्न; उत्तर ऐकून व्हाल थक्क!

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 9, 2024 14:28 IST2024-01-09T14:26:12+5:302024-01-09T14:28:24+5:30

नुकत्याच झालेल्या वीकेंड का वार' या खास भागात बॉलिवूड ब्युटी तब्बूने हजेरी लावली

Bigg Boss 17: Salman Khan and Tabu reveal their marriage plans | अखेर सलमान खान आणि तब्बूने सांगितलं कधी करणार लग्न; उत्तर ऐकून व्हाल थक्क!

अखेर सलमान खान आणि तब्बूने सांगितलं कधी करणार लग्न; उत्तर ऐकून व्हाल थक्क!

 'बिग बॉस 17' हा बहुचर्चित वादग्रस्त कार्यक्रम सुरू झाल्यापासून चर्चेत आहे. 'बिग बॉस'च्या घरातला 'वीकेंड का वार' खूप खास असतो. नुकत्याच झालेल्या वीकेंड का वार'  या खास भागात बॉलिवूड ब्युटी तब्बूने हजेरी लावली होती. यावेळी तब्बू आणि सलमान खान यांच्यातील खास बाँन्डिंगची झलक प्रेक्षकांना पाहायला मिळाली. तसेच दोघांनीही लग्न कधी करणार याबाबत खुलासा केला आहे. 

 'वीकेंड का वार' मध्ये तब्बूने घरातील स्पर्धकांशी चर्चा केली. यावेळी विकीला लग्नात किती फेरे घेतले असा प्रश्न तिने केला. तर विकी म्हणाला, 'आम्ही लग्नात चारपेक्षा जास्त फेरे घेतले होते आणि जेव्हा बिग बॉसमध्ये प्रवेश केला, तेव्हा त्यांनी (सलमानने) आम्हाला पुन्हा फेरे घेण्यास सांगितले. त्यांना असं वाटलं की मी तर घेत नाहीये तुम्हीच घेऊन टाका', असे मजेशीर अंदाजात विकी म्हणाला. यावर सलमान म्हणाला, 'आम्ही व्हीलचेअरवर लग्न करू, तिथून थेट आगीत जाणार आहोत'. या उत्तरावर सगळेच हसू लागले. 

बिग बॉसच्या घरात सलमाने तब्बू,सोबतची मैत्री खूप जुनी असल्याचे सांगितले. आम्ही एकमेंकाना खूप चांगले ओळखतो, असेही तो म्हणाला. शिवाय दोघांनी 'हुड हूड दबंग' गाण्यावर डान्सही केला.  तसेच तबूने सलमान खान आणि अजय देवगण यांचे दोन 'अनमोल रत्न' असे वर्णन केले. तसेच विकी चांगले खेळत आहे. पण, अरुण महाशेट्टी हैदराबादचा असल्याने तो आवडता स्पर्धक असल्याचे तब्बूने सांगितले. 

 'बिग बॉसच्या 17' वा सिझन फायनलकडे वळत आहे, तशी प्रेक्षकांची उत्सुकता वाढत आहे.  सध्या घरात अंकिता लोखंडे, विकी जैन, मुनव्वर फारुकी, आयशा खान,  ईशा मालवीय, समर्थ जुरेल, मन्नारा चोप्रा, अरुण महाशेट्टी, समर्थ जुरेल हे स्पर्धक आहेत. आता बिग बॉसच्या घरातून कोण बाहेर पडणार आणि बिग बॉसची ट्रॉफी कोण उंचावणार हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.

Web Title: Bigg Boss 17: Salman Khan and Tabu reveal their marriage plans