बिग बॉस 17 आता नव्या रंगात, सलमान खानने दिली हिंट; Promo व्हायरल

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 15, 2023 09:53 IST2023-09-15T09:50:26+5:302023-09-15T09:53:27+5:30

बिग बॉसमध्ये दिसणार वेगळाच रंग, जो बघून सगळे होतील दंग!

Bigg Boss 17 promo released salman khan gave hint of the show in new avatar | बिग बॉस 17 आता नव्या रंगात, सलमान खानने दिली हिंट; Promo व्हायरल

बिग बॉस 17 आता नव्या रंगात, सलमान खानने दिली हिंट; Promo व्हायरल

टेलिव्हिजनवरील वादग्रस्त शो बिग बॉसचा बघता बघता १७ वा सिझन आला आहे. दरवर्षीप्रमाणेच दबंग अभिनेता सलमान खानच (Salman Khan) शो होस्ट करणार आहे. 'बिग बॉस 17'  (Bigg Boss 17) चा प्रोमो रिलीज झाला आहे. सलमान खानने धाँसू एंट्री घेत प्रोमोमध्ये चार चाँद लावले आहेत. यामुळे प्रेक्षकांची उत्सुकता ताणली आहे. १७ व्या सिझनची नेमकी थीम काय असणार, कोण प्रेक्षक असणार हे लवकरच समोर येईल.

'कलर्स टीव्ही'ने सोशल मीडियावर प्रोमो व्हिडिओ पोस्ट केला आहे. यावेळी 'बिग बॉसमध्ये दिसणार वेगळाच रंग, जो बघून सगळे होतील दंग' या टॅगलाईनसह प्रोमो प्रदर्शित झाला आहे. सलमान खान एंट्री घेत म्हणतो, 'आतापर्यंत तुम्ही बिग बॉसचा फक्त डोळा पाहिलाय. आता दिसणार बिग बॉसचे तीन अवतार - दिल, दिमाग ही दिमाग आणि दम, आतासाठी इतकंच प्रोमो संपला.' हा प्रोमो काही तासातच व्हायरल झालाय.

बिग बॉसचे नवीन कोणते रंग यावेळी दिसणार यासाठी प्रेक्षक आतुर झालेत. बिग बॉसचा मागचा १६ वा सिझनचा प्रसिद्ध रॅपर एमसी स्टॅन विजेता ठरला होता. एमसी स्टॅनला प्रेक्षकांनी अक्षरश: डोक्यावर घेतले होते. तर नंतर बिग बॉसचा ओटीटी सिझनही आला ज्याचा विजेता एल्विश यादव ठरला. आता एल्विशलाही बिग बॉस १७ मध्ये घेऊन या अशी मागणी चाहते करत आहेत. एकूणच 'बिग बॉस 17' साठी सर्वच सज्ज झाले आहेत

Web Title: Bigg Boss 17 promo released salman khan gave hint of the show in new avatar