Bigg Boss 17 : अंकिता लोखंडेसोबत मनारा चोप्राचं भांडण म्हणाली, "मी तुझ्यापेक्षा जास्त चित्रपट केलेत"
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 26, 2023 16:04 IST2023-10-26T16:01:46+5:302023-10-26T16:04:08+5:30
अंकिता लोखंडे आणि मनारा चोप्रा यांच्यात बिग बॉसच्या घरात खटके उडताना दिसतायेत.

Bigg Boss 17 : अंकिता लोखंडेसोबत मनारा चोप्राचं भांडण म्हणाली, "मी तुझ्यापेक्षा जास्त चित्रपट केलेत"
बिग बॉस १७ सुरू होऊन अवघे काही दिवस झाले आहेत. अंकिता लोखंडे आणि मनारा चोप्रा यांच्या खटके उडताना दिसतायेत. आता नुकत्याच झालेल्या एपिसोडमध्ये पुन्हा एकदा मनारा आणि अंकिता यांच्यात भांडण झाले. बिग बॉसने घरातील सर्व सदस्यांना नवीन नियम सांगितला. बिग बॉसने सांगितले की, आता दिल, दिमाग आणि दम घर स्वत:चे जेवण स्वत: बनवाव लागेल. ज्यासाठी एक निश्चित वेळ दिला जाईल म्हणजेच बिग बॉस ठराविक वेळेनंतर गॅस पुरवठा खंडित करेल.
अंकिता लोखंडे या दरम्यान, स्वयंपाकघरातील कामचं वाटप करण्यासाठी घरात जाते. जिथे रिंकू धवन, जिग्ना वोरा, खानजादी आणि मनारा चोप्रा बसले आहेत. अंकिता येऊन तिचे मत मांडते. अंकिता जिग्ना आणि रिंकूला सांगते की ती तुमच्या दोघांशी बोलायला आली होती, कारण मनारा लहान आहे, तुम्ही तिची काळजी घ्या. मनाराला अंकिताची ही गोष्ट आवडली नाही आणि तिला राग येतो.
अंकिता लोखंडे गेल्यानंतर मनारा म्हणते की ती लहान नाही आणि खूप काही माहित आहे. मनारा पुढे म्हणाली की, मी तुझ्यापेक्षा जास्त चित्रपट केले आहेत. मनारा जिग्नाला म्हणाली - ती इतकी हुशार आहे की जिग्नाजी तुमचा वापर करुन पुढे निघून जाईल.
मनाराची नाराजी पाहून अंकिता तिला समजावण्याचा प्रयत्न करते की तिच्या बोलण्याचा चुकीचा अर्थ काढू नकोस, कारण तिचा हेतू चुकीचा नव्हता. मात्र, मनाराचा राग काही कमी होत नाही. शेवटी, अंकिताने आपल्या वडिलांची शपथ घेऊन सांगते तिने त्याला टोमणा मारला नाही. नंतर, रिंकू धवन देखील मनाराला समजावण्याचा प्रयत्न करते की अंकिता कदाचित बरोबर आहे, कारण ती तिच्या वडिलांची खोटी शपथ घेणार नाही.