अंकिता आणि सुशांतच्या नात्याबद्दल पहिल्यांदाच बोलला विकी जैन; म्हणाला, "त्या दोघांमध्ये..."

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 30, 2024 17:54 IST2024-01-30T17:53:44+5:302024-01-30T17:54:33+5:30

"मला त्यांच्याबद्दल सगळं माहीत होतं", अंकिता-सुशांतच्या रिलेशनशिपबाबत विकी जैनचं मोठं विधान

bigg boss 17 fame vicky jain talk about ankita lokhande and sushant singh rajput relationship | अंकिता आणि सुशांतच्या नात्याबद्दल पहिल्यांदाच बोलला विकी जैन; म्हणाला, "त्या दोघांमध्ये..."

अंकिता आणि सुशांतच्या नात्याबद्दल पहिल्यांदाच बोलला विकी जैन; म्हणाला, "त्या दोघांमध्ये..."

'बिग बॉस हिंदी'च्या १७व्या पर्वामधून विकी जैन घराघरात पोहोचला. विकीने अंकिता लोखंडेसोबत 'बिग बॉस'च्या घरात एन्ट्री घेतली होती. पहिल्या दिवसापासूनच तो 'बिग बॉस'च्या घरातील चर्चेतील चेहरा होता. पण, खेळापेक्षा जास्त विकी अंकिताबरोबर होणाऱ्या वादांमुळेच चर्चेत होता. अंकिताही 'बिग बॉस'च्या घरात वारंवार सुशांत सिंह राजपूतचं नाव घेताना दिसली. त्यामुळे तिला ट्रोलही करण्यात आलं होतं. शिवाय अंकिताची आई आणि तिची सासूही यामुळे तिच्यावर नाराज होत्या. आता पहिल्यांदाच विकीने अंकिता आणि सुशांतच्या नात्याबद्दल भाष्य केलं आहे. 

'बिग बॉस'च्या घरातून बाहेर पडल्यानंतर विकीने नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत शोमधील जर्नीबाबत सांगितलं. त्याबरोबरच त्याने अंकिता आणि सुशांतच्या नात्यावरही त्याचं मत मांडलं. 'गल्लाटा इंडिया'ला दिलेल्या मुलाखतीत विकी म्हणाला, "रिलेशनशिपमध्ये कधी कधी अशा गोष्टीही होतात. ज्याच्यासाठी आपण तयार नसतो. पण, अशा परिस्थितीत तुम्ही एकमेकांना कसं सपोर्ट करता, यामुळे तुमचं नातं घट्ट होतं. अंकिता आणि सुशांतचं रिलेशनशिप कसं होतं हे मला माहीत होतं. मला त्यांच्याबद्दल सगळं काही माहीत होतं. त्यांचं नातं खूप सकारात्मक होतं. मी खूप प्रॅक्टिकल आहे. आणि मला या गोष्टींनी फरक पडत नाही." 

पुढे तो म्हणाला, "प्रॅक्टिकल असणं गरजेचं आहे. या गोष्टी होत राहतात. अंकिताच्या मनात सुशांतबद्दल काय आहे, हे मला माहीत आहे. पण, यामुळे मला असुरक्षित वाटत नाही. दरम्यान, विकीला फिनालेचं तिकीट न मिळाल्याने त्याला 'बिग बॉस'च्या घरातून बाहेर पडावं लागलं होतं. तर अंकिताला टॉप ५मध्ये जागा मिळवूनही 'बिग बॉस'च्या ट्रॉफीवर नाव कोरता आलं नाही.  

Web Title: bigg boss 17 fame vicky jain talk about ankita lokhande and sushant singh rajput relationship