Bigg Boss 17: मराठी पोरगी पडतेय भारी! 'बिग बॉस'च्या घरात राहण्यासाठी अंकिता लोखंडे घेते इतके मानधन हे घेते
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 30, 2023 12:09 IST2023-11-30T12:08:00+5:302023-11-30T12:09:31+5:30
पहिल्या दिवसापासूनच अंकिता लोखंडे 'बिग बॉस'च्या घरातील चर्चेतील चेहऱ्यांपैकी एक आहे.

Bigg Boss 17: मराठी पोरगी पडतेय भारी! 'बिग बॉस'च्या घरात राहण्यासाठी अंकिता लोखंडे घेते इतके मानधन हे घेते
'बिग बॉस हिंदी'चं नवं पर्व दिवसेंदिवस अधिक रंजक होत चाललं आहे. पहिल्या दिवसापासूनच अंकिता लोखंडे 'बिग बॉस'च्या घरातील चर्चेतील चेहऱ्यांपैकी एक आहे. 'बिग बॉस १७'मध्ये अंकिता पती विकी जैनसह सहभागी झाली आहे. अंकिता टीव्हीवरील प्रसिद्ध चेहरा आहे. बिग बॉसच्या घरात गेल्यापासून ती कोणत्याना कोणत्या कारणामुळे चर्चेत आहे.
अंकिता लोखंडेने आपल्या करिअरची सुरुवात पवित्र रिश्ता या टीव्ही शोमधून केली होती. तिच्या पहिल्याच शोने अभिनेत्रीला स्टार बनवले. अंकिता लोखंडेला गेल्या अनेक वर्षांपासून बिग बॉसची ऑफर देण्यात आली होती, परंतु अभिनेत्रीने प्रत्येक वेळी हा शो नाकारला. या सीझनमध्ये शेवटी तिने सामील होण्याचा निर्णय घेतला. अंकिता लोखंडे पती विकी जैनसोबत बिग बॉस 17 मध्ये सहभागी झाली.
अंकिता लोखंडे बिग बॉस 17 मध्ये सहभागी होण्यासाठी भरघोस फी देखील आकारत आहे. टाईम्स नाऊच्या रिपोर्टनुसार, या शोमधून अभिनेत्री दर आठवड्याला लाखोंची कमाई करत आहे. अभिनेत्री बिग बॉस 17 मध्ये एका आठवड्यासाठी 12 लाख रुपये मानधन घेत आहे. यासह अंकिता लोखंडे या शोमध्ये सर्वाधिक कमाई करणारी स्पर्धक बनली आहे.