Bigg boss 16: कुणी काम देतं का काम..., असं म्हणण्याची वेळ आली होती या स्पर्धकावर
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 2, 2022 15:50 IST2022-10-02T15:49:20+5:302022-10-02T15:50:04+5:30
Bigg Boss 16 : छोट्या पडद्यावरील लोकप्रिय वादग्रस्त रिअॅलिटी शो 'बिग बॉस'चा सीझन १६ नुकताच सुरु झाला. सीझन १६ मधील सर्व स्पर्धक 'बिग बॉस'च्या घरात ग्रॅण्ड एन्ट्री घेताना दिसले होते.

Bigg boss 16: कुणी काम देतं का काम..., असं म्हणण्याची वेळ आली होती या स्पर्धकावर
छोट्या पडद्यावरील लोकप्रिय वादग्रस्त रिअॅलिटी शो 'बिग बॉस'चा सीझन १६ (Bigg Boss 16) नुकताच सुरु झाला. शोचा पहिला भाग १ ऑक्टोबर रोजी प्रसारित झाला होता, ज्यामध्ये सीझन १६ मधील सर्व स्पर्धक 'बिग बॉस'च्या घरात ग्रॅण्ड एन्ट्री घेताना दिसले होते. 'बिग बॉस'च्या या सीझनमध्ये ब्युटी क्वीन मान्या सिंगनेही प्रवेश केला आहे, जी मिस इंडिया २०२० ची उपविजेती होती. मान्या या शोमध्ये आली आणि तिने सांगितले की ती तिची स्वप्ने पूर्ण करण्यासाठी येथे आली आहे. इतकेच नाही तर ब्युटी क्वीनने सलमान खानच्या शोमध्ये तिच्या संघर्षाबद्दलही सांगितले.
'बिग बॉस'च्या घरात आल्यावर मान्या सिंगने तिच्या आयुष्यातील कठीण दिवसांबद्दल सांगितले. ती म्हणाली की, लोकांना वाटते की मिस इंडिया झाल्यानंतर माझे आयुष्य बदलले आणि माझेही बदलले असावे. भरपूर पैसे मिळतील. पण ते तसे नाही. वास्तव हे आहे की मिस इंडिया रनर अप झाल्यानंतरही मला कोणतेही काम मिळाले नाही. दोन वर्षांच्या प्रदीर्घ प्रतिक्षेनंतर मला एक जाहिरात मिळाली.
मान्या सिंगने पुढे सांगितले की लोक तिच्या सावळ्या रंगावर कमेंट करतात. ती मिस इंडिया रनर अप झाली आहे पण आजही तिचे वडील ऑटो चालवतात आणि आजही ती तिच्या वडिलांच्या ऑटोमधून प्रवास करते. तिची आईही लोकल ट्रेनमध्ये प्रवास करते. पैसे वाचवण्यासाठी. आपल्या आयुष्यातील कठीण टप्प्याबद्दल बोलताना मान्या सिंग खूपच भावूक झाली होती.