Bigg Boss 16 Grand Finale : बदतमीज़ शिव...! फिनाले नाईटमध्येच आपआपसात भिडले शिव व प्रियंका...!!
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 12, 2023 21:03 IST2023-02-12T21:03:08+5:302023-02-12T21:03:52+5:30
Bigg Boss 16 Grand Finale Live : फिनालेची सुरूवात झाली ती भारती व कृष्णाच्या कॉमेडीनं. कृष्णा व भारतीने घरात धम्माल केली. टॉप स्पर्धक एकमेकांबद्दल काय विचार करतात, हेही त्यांनी जाणून घेतलं...

Bigg Boss 16 Grand Finale : बदतमीज़ शिव...! फिनाले नाईटमध्येच आपआपसात भिडले शिव व प्रियंका...!!
Bigg Boss 16 Grand Finale Live : बिग बॉसचा १६ वा सीझन धमाकेदार ग्रॅण्ड फिनाले सुरू झाला आणि हा सीझन कोण जिंकणार, हे जाणून घेण्याची चाहत्यांची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे. फिनालेची सुरूवात झाली ती भारती व कृष्णाच्या कॉमेडीनं. कृष्णा व भारतीने घरात धम्माल केली. टॉप ५ स्पर्धकांसोबत काही मजेशीर गेम्सही खेळलेत. टॉप स्पर्धक एकमेकांबद्दल काय विचार करतात, हेही त्यांनी जाणून घेतलं. यादरम्यान प्रियंका व शिव एकमेकांशी भांडताना दिसले.
भांडण, वाद हा बिग बॉसचा अलिखित नियम. पण फिनालेच्या रात्रीही शिव व प्रियंका एकमेकांशी भांडताना दिसले. शिव हा स्वार्थी आहे, चतूर आहे, असभ्य आहे, असं प्रियंका म्हणाली. प्रियंकाच्याच भाषेत सांगायचं तर शिव हा बदतमीज़ आहे, असं प्रियंका म्हणाली.
शिवनेही प्रियंकाच्या त्रुटींवर बोट ठेवलंच. प्रियंका निम्रतचा द्वेष करते, तिचा मत्सर करते, असं शिव म्हणाला. शिव व प्रियंकाच्या या फिनाले फाईटची चांगलीच चर्चा रंगली.
तूर्तास शिव ठाकरे, प्रियंका चहर चौधरी, एम सी स्टॅन, अर्चना गौतम आणि शालीन भनोट हे पाच स्पर्धक फायनलमध्ये पोहोचलेत. यापैकी बिग बॉसची ट्राफी कोण जिंकतो, हे पाहणं इंटरेस्टिंग असणार आहे. तूर्तास तरी प्रियंका व शिव ठाकरेचं पारडं जड आहे. यातही प्रियंकाच हा शो जिंकणार, असा दावा सोशल मीडियावर केला जात आहे.