'बिग बॉस १६'नंतर शिव ठाकरे झाला मालामाल, लाखोंची कार खरेदी केल्यानंतर सुरु केला स्वत:चा व्यवसाय

By ऑनलाइन लोकमत | Published: March 23, 2023 12:30 PM2023-03-23T12:30:15+5:302023-03-23T12:45:00+5:30

'बिग बॉस १६' (Bigg Boss 16)नंतर त्याचे नशीबच चमकलं आहे.

Bigg boss 16 fame shiv thakare has started his own restaurant after buying a new car | 'बिग बॉस १६'नंतर शिव ठाकरे झाला मालामाल, लाखोंची कार खरेदी केल्यानंतर सुरु केला स्वत:चा व्यवसाय

'बिग बॉस १६'नंतर शिव ठाकरे झाला मालामाल, लाखोंची कार खरेदी केल्यानंतर सुरु केला स्वत:चा व्यवसाय

googlenewsNext

शिव ठाकरे (Shiv Thakare) याने छोट्या पडद्यावरील लोकप्रिय आणि वादग्रस्त रिएलिटी शो  'बिग बॉस १६' (Bigg Boss 16)नंतर त्याचे नशीबच बदलले. शिव ठाकरे बिग बॉस १६(Bigg Boss 16)चा उपविजेता ठरला.  'बिग बॉस १६' च्या ट्रॉफीनं शिव ठाकरेला हुलकावणी दिली. पण प्रेक्षकांची मनं जिंकण्यात मात्र तो यशस्वी झाला. 'बिग बॉस १६'नंतर शिव लोकप्रियतेच्या शिखरावर आहे.  शिव ‘बिग बॉस’च्या घरातील सर्वाधिक चर्चेतील चेहऱ्यांपैकी एक होता. अलिकडेच शिवने आलिशान कार खरेदी केली आहे यानंतर त्याने स्वत:चा बिझनेसही सुरु केला आहे. 


शिव ठाकरे  रेस्टॉरंट सुरू केले, ज्याचे उद्घाटन त्यांनी मोठ्या थाटात केले. शिव यांनी या रेस्टॉरंटला 'ठाकरे - चहा आणि नाश्ता' असे नाव दिले आहे. हे रेस्टॉरंट शिवने अमरावतीला सुरु केले आहे. मात्र, तो लवकरच या रेस्टॉरंटच्या शाखा वेगवेगळ्या ठिकाणी सुरु करणार आहे.

शिव ठाकरेच्या नवीन रेस्टॉरंटचे फोटो सोशल मीडियावर मोठ्या व्हायरल होत आहेत, ज्यात तो त्याच्या रेस्टॉरंटचे प्रमोशन करताना दिसत आहेत. चाहते या फोटोंवर कमेंट करत आहेत. काही दिवसांपूर्वीच शिवने महागडी कार खरेदी केली होती. त्यानंतर त्यांना आता स्वत:चा व्यवसायही सुरु केला आहे. 

सध्या शिव विविध प्रोजेक्ट्समध्ये व्यस्त आहे. त्याने स्वतःचे युट्यूब चॅनेल लाँच केले आहे. याशिवाय तो वेगवेगळ्या कार्यक्रमांनाही हजेरी लावताना दिसत आहे.
 

Web Title: Bigg boss 16 fame shiv thakare has started his own restaurant after buying a new car

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.