विस्कटलेले केस, मळकट कपडे! bigg boss फेम अभिनेत्रीची अवस्था पाहून चाहते संभ्रमात

By ऑनलाइन लोकमत | Published: April 11, 2024 11:56 AM2024-04-11T11:56:26+5:302024-04-11T11:57:36+5:30

Priyanka chahar choudhary: कलाविश्वातील अभिनेत्री कायम ग्लॅमरस लूकमुळे चर्चेत येत असतात. परंतु, प्रियांका चहर चौधरी तिच्या विचित्र अवस्थेमुळे चर्चेत आली आहे.

bigg-boss-16-fame-priyanka-chahar-choudhary-video-viral-in-dirty-clothes-and-massy-hair-fans-shocked | विस्कटलेले केस, मळकट कपडे! bigg boss फेम अभिनेत्रीची अवस्था पाहून चाहते संभ्रमात

विस्कटलेले केस, मळकट कपडे! bigg boss फेम अभिनेत्रीची अवस्था पाहून चाहते संभ्रमात

कलाविश्वात वावरणारे कलाकार कायम कॅमेरासमोर किंवा चाहत्यांसमोर येतांना ग्लॅमरस लूकमध्ये येत असतात. त्यामुळे त्यांच्या लक्झरी लाइफस्टाइलची अनेकदा नेटकऱ्यांमध्ये चर्चा होते. यात खासकरुन अभिनेत्री तर त्यांच्या महागड्या कपड्यांमुळे वा अॅक्ससिरीजमुळे चर्चेत असतात. परंतु, यावेळी अभिनेत्री एक अभिनेत्री तिच्या अस्ताव्यस्थ अवस्थेमुळे चर्चेत आली आहे.

सोशल मीडियावर सध्या बिग बॉस फेम अभिनेत्री प्रियांका चहर (Priyanka chahar choudhary) चर्चेत येत आहे. प्रियांकाचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये ती मळकट कपडे, विस्कटलेले केस अशा विचित्र अंदाजात दिसून येत आहे. विशेष म्हणजे

या लूकमध्ये ती एका पंचतारांकित हॉटेलसमोर स्पॉट झाली. त्यामुळे तिच्यासोबत नेमकं काय झालंय? ती अशी का दिसते हा प्रश्न अनेकांना पडला आहे. तिचा हा व्हिडीओ विरल भय्यानी यांनी त्यांच्या इन्स्टाग्राम पेजवर शेअर केला आहे.

प्रियांकाचा हा लूक पाहून चाहते चांगलेच संभ्रमात पडले आहेत. प्रियांकाला नेमकं झालं तरी काय? तिने तिच्या आगामी प्रोजेक्टच्या प्रमोशनसाठी असं केलंय का? असे कितीतरी प्रश्न नेटकऱ्यांना पडले आहेत.

दरम्यान, प्रियांका अनेकदा म्युझिक अल्बमच्या माध्यमातून चाहत्यांच्या संपर्कात येत असते. प्रियांका आता ‘दोस्त बनके’ या आणखी एका म्युझिक व्हिडिओमध्ये दिसणार आहे. त्यामुळे सध्या तिचा व्हायरल होत असलेला हा लूक याच म्युझिक अल्बमचा भाग असल्याचं म्हटलं जात आहे.

Web Title: bigg-boss-16-fame-priyanka-chahar-choudhary-video-viral-in-dirty-clothes-and-massy-hair-fans-shocked

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.