बिग बॉस 16 नंतर अब्दू रोजिकचे नशीब चमकले, मुंबईत स्वत:चा व्यवसाय सुरू करणार!
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 24, 2023 23:38 IST2023-02-24T23:28:46+5:302023-02-24T23:38:56+5:30
ताजिकिस्तानचा प्रसिद्ध गायक अब्दू रोजिक याला शोमध्ये सर्वाधिक पसंती मिळाली. फॅन्ससह अब्दू रोजिक सलमान खानचा सुद्धा फेव्हरेट होता.

बिग बॉस 16 नंतर अब्दू रोजिकचे नशीब चमकले, मुंबईत स्वत:चा व्यवसाय सुरू करणार!
सलमान खानचा लोकप्रिय रिअॅलिटी शो बिग बॉस 16 (Bigg Boss 16) संपल्यानंतर अब्दू रोजिक चर्चेत आहे. ताजिकिस्तानचा प्रसिद्ध गायक अब्दू रोजिक याला शोमध्ये सर्वाधिक पसंती मिळाली. फॅन्ससह अब्दू रोजिक सलमान खानचा सुद्धा फेव्हरेट होता. आता त्याचा एक व्हिडिओ समोर आला आहे, जो मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये अब्दू रोजिक फॅन्ससोबत गोड बातमी शेअर करत आहे.
विरल भयानीने आपल्या इंस्टाग्रामवर एक व्हिडिओ शेअर केला आहे. ज्यामध्ये अब्दू रोजिक गाडीतून खाली उतरताना दिसत आहे. दरम्यान, कॅमेऱ्यात कैद झालेला अब्दू रोजिक मुंबई विमानतळावर दिसला आहे. लवकरच भारतात स्वतःचे एक रेस्टॉरंट उघडणार आहे, असे म्हणताना अब्दू रोजिक या व्हिडिओमध्ये दिसत आहे. ही बातमी त्याच्या फॅन्ससाठी सरप्राइजपेक्षा कमी नाही. इतकेच नाही तर अब्दू रोजिकने लोकांना रेस्टॉरंट उघडल्यानंतर आमंत्रित देखील केले आहे.
अब्दू रोजिक व्हिडिओमध्ये म्हणतो की, "मी लवकरच भारतात माझे रेस्टॉरंट उघडणार आहे. मी 6 मार्चला भारतात परत येईन आणि मुंबईत माझे रेस्टॉरंट उघडणार आहे." दरम्यान, अब्दू रोजिकने भारतात पहिले रेस्टॉरंट उघडण्याची घोषणा केली आहे. अब्दु रोजिकचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. त्याचे फॅन्स या व्हिडिओला लाइक करत आहेत आणि सतत कमेंट करत आहेत.
सोशल मीडिया इन्फ्लुएंसर आहे अब्दु रोजिक!
बिग बॉस 16 मध्ये अब्दु रोजिक आणि साजिद खान यांची मैत्री चांगलीच गाजली होती. दुसरीकडे, अब्दु रोजिकच्या वैयक्तिक आयुष्याबद्दल बोलायचे झाल्यास, अब्दू रोजिक हा एक गायक तसेच सोशल मीडिया इन्फ्लुएंसर आहे. नुकतेच त्याचे एक गाणे रिलीज झाले आहे. काही दिवसांपूर्वी त्याचा एक जुना व्हिडिओही समोर आला होता, ज्यामध्ये तो रस्त्यावर गाताना दिसत होता. बिग बॉसच्या घरातही त्याच्या या प्रवासाचे कौतुक झाले.