Bigg Boss 15 : बिग बॉसच्या घरात तेजस्वी प्रकाशने दिली प्रेमाची कबुली, व्हिडीओ होतोय व्हायरल

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 6, 2021 19:19 IST2021-10-06T19:18:56+5:302021-10-06T19:19:35+5:30

Bigg Boss 15 : बिग बॉसच्या घरातील तेजस्वी प्रकाशचा एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होताना दिसत आहे.

Bigg Boss 15: Tejaswi Prakash confess her love in Bigg Boss's house , video goes viral | Bigg Boss 15 : बिग बॉसच्या घरात तेजस्वी प्रकाशने दिली प्रेमाची कबुली, व्हिडीओ होतोय व्हायरल

Bigg Boss 15 : बिग बॉसच्या घरात तेजस्वी प्रकाशने दिली प्रेमाची कबुली, व्हिडीओ होतोय व्हायरल

छोट्या पडद्यावरील लोकप्रिय आणि वादग्रस्त रिएलिटी शो बिग बॉसच्या १५व्या सीझनला नुकतीच सुरूवात झाली आहे. यंदाच्या जंगल थीममुळे प्रेक्षक आणखी उत्सुक झाले आहेत. शोच्या सुरूवातीपासून ट्विस्ट आणल्यामुळे यंदाच्या सीझनला प्रेक्षकांची पसंती मिळते आहे. सध्या बिग बॉसच्या घरात बिग बॉस ओटीटीमधील स्पर्धक शमिता शेट्टी, निशांत भट, प्रतीक सेजपाल यांना मिळाली आहे. तसेच त्यांना काही अधिकारही देण्यात आले आहेत. यानुसार ते ज्या स्पर्धकांची निवड करतील तेच बिग बॉसच्या घरात राहतील. इतर स्पर्धकांना अंगणात राहायचे आहे, ज्याचे परिवर्तन जंगलात करण्यात आले आहे. या जंगलवासियांना त्यांच्या मूलभूत गरजांसाठी लढावे लागणार आहे. हा शो सुरू होऊन दोन दिवस सुद्धा झाले नाहीत तर घरात वाददेखील पहायला मिळाले. एकीकडे कालच्या भागात प्रतीक आणि जय भानुशालीमध्ये खूप मोठे भांडण झाले. तर दुसरीकडे आजच्या भागात अभिनेत्री तेजस्वी प्रकाश तिच्या प्रेमाची कबुली देताना दिसली. तिचा हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर तूफान व्हायरल होतो आहे.

तेजस्वी प्रकाशचा बिग बॉसच्या घरातील एक व्हिडीओ नुकताच कलर्स वाहिनीने इंस्टाग्रामवर शेअर केला आहे. जंगलवासी तेजस्वी प्रकाश बिग बॉसशी गप्पा मारताना दिसते आहे. ती बिग बॉसशी फ्लर्ट करत असून ती बिग बॉसला बेबी या नावाने हाक मारताना दिसते आहे. ती म्हणतेय की, तुम्ही आता आपल्या प्रेमाची कबुली देऊन टाका. मी अशी राहिली तर ते चांगले दिसेल का? आणि तुम्हाला ते पटेल का? नाही ना तर प्लीज आमचे कपडे आम्हाला पाठवून द्या. अनेकदा विनंती केल्यावर ती म्हणताना दिसते आहे की, जाऊ दे तुम्ही काहीच करु शकत नाहीत.


युजर्स म्हणताहेत, तेजू रॉक्स!
तेजस्वी प्रकाशचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होताना दिसत आहे. तिच्या या व्हिडीओवर मजेशीर कमेंट्स पहायला मिळत आहेत. ‘तेजू रॉक्स’ अशी कमेंट करुन तिला प्रोत्साहन देताना दिसत आहेत. एका युजरने लिहिले, तेजू तुझी पर्सनॅलिटी खूप वेगळी आहे. तर दुसऱ्या युजरने म्हटले की, मी याच गोष्टीची वाट पाहत होतो. तर तिसऱ्या युजरने म्हटले की, तिच्यामुळेच घरात खरे मनोरंजन होत आहे. तसेच या पोस्टच्या कमेंट सेक्शनमध्ये अभिनेत्री अमृता खानविलकरने लिहिले की, वेडी मुलगी तेजू रॉक्स.

Web Title: Bigg Boss 15: Tejaswi Prakash confess her love in Bigg Boss's house , video goes viral