Bigg Boss 15 : घरात घुसण्याचा सेलिब्रेटीचा प्रयत्न, स्पायडरमन बनत केला राडा
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 14, 2021 12:01 IST2021-10-14T11:32:12+5:302021-10-14T12:01:41+5:30
बिग बॉसचा १५ सिझनही दणक्यात सुरु झाला आहे.नेहमीप्रमाणे या शोने रसिकांचे लक्ष वेधून घेण्यात यशस्वी ठरत आहे.

Bigg Boss 15 : घरात घुसण्याचा सेलिब्रेटीचा प्रयत्न, स्पायडरमन बनत केला राडा
कॉन्ट्रोव्हर्सी क्वीन, आयटम गर्ल, एक अशी व्यक्ती जिच्यासाठी चर्चेत राहणं काहीच अवघड नाही, ती म्हणजे अभिनेत्री राखी सावंत. ती कायमच कोणत्या ना कोणत्या कारणामुळे चर्चेत असते. बिग बॉसचा १४ वा सिझन ख-या अर्थाने राखी सावंतनेच गाजवला. एटंरटेंमेंटची क्वीन म्हणून ती ओळखली जावू लागली. रसिकांचे मनोरंजन करण्यासाठी तिने कोणतीच कसर बाकी ठेवली नव्हती. वेगवेगळ्या शक्कल लढवत ती रसिकांचे मनोरंजन करत राहिली. राखी सावंतचा विनोदी अंदाजाने रसिकांचीही मनं जिंकली होती. गेल्या सिझनची सर्वाधिक फेव्हरेट स्पर्धक राखीच ठरली होती.
बिग बॉसनंतर राखी सावंत पुन्हा एकदा चर्चेत आली. बघावं तिथे राखी सावंतच्या चर्चा रंगल्या. शो संपल्यानंतरही राखी फिव्हर बघायला मिळाला. प्रत्यक्ष जीवनातही सतत मीडियाच्या कॅमे-यात राखी कैद होत राहिली. आणि राखीनेही कधीच मीडियाला नाराज केले नाही. प्रत्येकवेळी तिने मीडिया जिथे तिला रोकेल तिथे फोटो पोज देत राहिली. वेळ पडल्यास मीडिया फोटोग्राफरकडूनही वेगवेगळी माहिती जाणून घ्यायची.
बिग बॉसचा १५ सिझनही दणक्यात सुरु झाला आहे. शोमध्ये नुकतेच राखीने हजेरी लावली होती. नवरात्री सुरु असल्यामुळे गरबा क्वीन बनत तिने शोमध्ये एंट्री मारली होती. तिचा कलरफुल ट्रेडिशनल अंदाज पाहून सलमानही भारावला होता. घरातल्या स्पर्धकांसह संवाद साधत, घरात त्यांच्या परफॉर्मन्सबद्दलही राखीने सांगितले. तसेच घरात टिकून राहायचं असेल त्यासाठी स्पर्धकांना खास टीप्सही दिल्या. एका एपिसोडसाठी आलेली राखीने पुन्हा एकदा ख-या अर्थाने शोला चारचाँद लावले होते.
आता पुन्हा राखीचा एक व्हिडीओ समोर आला आहे. या व्हि़डीओमध्ये राखीने चक्क स्पारयडरमॅनच्या पेहरावत दिसत आहे. बिग बॉसच्या घरात जाण्यासाठी हा सगळा खटाटोप केल्याचे ती सांगताना दिसत आहे. बिग बॉस म्हटलं की राखीची नौटंकी थांबता थांबत नाही. सतत रसिकांचे लक्ष वेधून घेण्यासाठी वेगवेगळ्या गोष्टी करताना दिसते. चर्चेत राहण्यासाठीच राखीने पुन्हा एकदा ड्रामेबाजी करायला सुरुवात केली आहे. सध्या हा व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला आहे. व्हिडीओ पाहून राखीचे चाहतेही हसून हसून लोटपोट होत आहेत. नेटीझन्सही राखीच्या या व्हिडीओला लाईक्स आणि पसंती देत असल्याचे पाहायला मिळत आहे.