काय? राखी सावंत नाही, तर फोटोत दिसणारी ‘ही’ महिला आहे राखीच्या नवऱ्याची खरी बायको?
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 10, 2021 15:15 IST2021-12-10T15:13:11+5:302021-12-10T15:15:44+5:30
Rakhi Sawant : माझ्या नवऱ्याची बायको! ‘Bigg Boss 15’मध्ये राखीनं पती रितेशसोबत वाईल्ड कार्ड एन्ट्री घेतली.अर्थात तरिही ‘बिग बॉस 15’च्या घरात दिसणारा रितेश हाच राखीचा पती आहे, यावर लोकांचा विश्वास बसेना.

काय? राखी सावंत नाही, तर फोटोत दिसणारी ‘ही’ महिला आहे राखीच्या नवऱ्याची खरी बायको?
राखी सावंत ( Rakhi Sawant ) सध्या तिचा पती रितेशसोबत ‘बिग बॉस 15’मध्ये (Bigg Boss 15) धुमाकूळ घालतेय. राखीने म्हणे 2018 साली लग्न केलं होतं. पण आत्ता आत्तापर्यंत तिचा पती कोण, कुठला कोणालाही ठाऊक नव्हतं. साहजिक राखी खरं बोलतेय की ड्रामा करतेय, हे कळायला मार्ग नव्हता. पण ‘बिग बॉस 15’मध्ये राखीनं पती रितेशसोबत (Rakhi Sawant husband Ritesh) वाईल्ड कार्ड एन्ट्री घेतली आणि सर्वांची तोंड गप्प केलीत. अर्थात तरिही ‘बिग बॉस 15’च्या घरात दिसणारा रितेश हाच राखीचा पती आहे, यावर लोकांचा विश्वास बसेना. होय, अद्यापही राखीचं लग्न खरंच झालंय, हेच लोक मानायला तयार नाहीत.
अगदी ‘बिग बॉस 15’चा होस्ट सलमान खानही ‘कनफ्युज’ आहे. हा खरोखर तुझा पती आहे की शोसाठी याला हायर केलं आहेस? असा प्रश्न हसत हसत का होईना सलमानने राखीला विचारला होताच. अशात राखीचा पती रितेशचा एक नवा फोटो समोर आला आहे आणि तो पाहून सगळ्यांनाच धक्का बसला आहे. कारण हा फोटो रितेश व राखीचा नाही तर रितेशच्या खऱ्या बायकोचा आहे. फोटोत दिसणारी महिला रितेशची खरी पत्नी असल्याचा दावा सध्या केला जातोय.
बिग बॉसच्या घरातील बित्तंमबातमी देणा-या ‘द खबरी’ने रितेशचा एक फोटो पोस्ट केला आहे. फोटोमधील महिला रितेशची खरी पत्नी असल्याचा दावा ‘द खबरी’ने आपल्या पोस्टमध्ये केला आहे. रितेशने 2014 साली फोटोतील महिलेसोबत लग्न केल्याचा दावाही ‘द खबरी’ने केला आहे.
आम्ही या दाव्याचे कोणत्याही प्रकारे समर्थन करत नाही. पण सध्या रितेशच्या या खऱ्या ‘पत्नी’चा फोटो चांगलाच व्हायरल होतोय. याआधी ‘द खबरी’ने रितेश हा बिग बॉसचा कॅमेरामॅन तर नाही? अशा आशयाचं ट्विट केलं होतं.