Bigg Boss 15: 'मला बोलण्याचा छंद नाही, मॅडम'; शमिता शेट्टीवर भडकला सलमान खान
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 30, 2021 18:27 IST2021-10-30T18:26:39+5:302021-10-30T18:27:10+5:30
Bigg Boss 15: शमिता शेट्टीवर सलमान खान चांगलाच भडकला.

Bigg Boss 15: 'मला बोलण्याचा छंद नाही, मॅडम'; शमिता शेट्टीवर भडकला सलमान खान
छोट्या पडद्यावरील लोकप्रिय आणि वादग्रस्त रिएलिटी शो बिग बॉसच्या १५व्या सीझनमध्ये सूर्यवंशी चित्रपटाची टीम हजेरी लावणार आहे. दिवाळी सेलिब्रेशनच्या निमित्ताने जबरदस्त एण्टरटेन्मेंट पहायला मिळणार आहे. तर सलमान खान घरातील सदस्यांची शाळा घेताना दिसणार आहे. शोचा प्रोमो समोर आला आहे ज्यात सलमान खानने शमिता शेट्टीची शाळा घेतली आहे. तसेच तेजस्वी प्रकाशलाही चांगलेच सुनावले आहे
शमिता शेट्टीने सलमान खानच्या म्हणण्यावर सहमती दर्शवली नाही. शमिता आवाज चढवून सलमान खानसोबत बोलताना दिसली. ही बाब सलमान खानला अजिबात आवडली नाही. व्हिडीओत तेजस्वी आणि शर्मिताला सुनावत सलमान खान म्हणाला की, तू घराची राणी आहे. तसे तर आणखी एक राणी या घरात आहे. शमिता शेट्टी. शीशमहलची राणी. हे आपल्या घरातील दोन राणी आहेत.
त्यावर उत्तर देत शमिता शेट्टी म्हणाली की, तर मी काय करू मी अशीच जन्माला आली आहे. तुम्हाला सांगते की मी घरात सर्वात जास्त काम करते आहे. हे खूप खेदजनक आहे. या गोष्टी शमिता शेट्टी सलमान खानला उद्धटपणे बोलताना दिसते आहे. यावर नाराज होत सलमान खानने म्हटले की, मला बोलण्याचा इतका कोणता छंद नाही आहे मॅडम. माझे चालेल तर मी हा संपूर्ण एपिसोड सायलेंटमध्ये काढेन. आऊं पण नाही.
विकेंडच्या वॉरमध्ये खूप ड्रामा पहायला मिळणार आहे. घऱातील सदस्यांना महत्त्वाचा टास्क दिला आहे. या आठवड्यात एक सदस्य घराबाहेर पडणार आहे.