Bigg Boss 15 Finale: फिनालेआधीच ‘बिग बॉस 15’च्या विजेत्याचं नाव लीक? व्हायरल फोटोत केला जातोय हा दावा
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 30, 2022 17:36 IST2022-01-30T17:33:28+5:302022-01-30T17:36:37+5:30
Bigg Boss 15 Finale: बिग बॉसच्या ट्रॉफीवर कोण आपलं नाव कोरणार? ही उत्सुकता आहेच. मात्र त्याआधी सोशल मीडियावर विनरच्या नावाचा एक फोटो व्हायरल होतोय.

Bigg Boss 15 Finale: फिनालेआधीच ‘बिग बॉस 15’च्या विजेत्याचं नाव लीक? व्हायरल फोटोत केला जातोय हा दावा
Bigg Boss 15 Finale: टीव्हीवरचा सर्वात लोकप्रिय आणि तितकाच वादग्रस्त शो म्हणजे बिग बॉस. ‘बिग बॉस 15’ फिनालेला अगदी काही तास उरले आहेत. ‘बिग बॉस 15’ची ट्रॉफी कोण जिंकणार? हे जाणून घेण्यास चाहते उत्सुक आहेत. मात्र त्याआधीच ‘बिग बॉस 15’च्या विजेत्याचं नाव लीक झाल्याची चर्चा आहे. अंतिम फेरीत करण कुंद्रा (Karan Kundrra ), प्रतीक सहजपाल (Pratik Sehajpal), तेजस्वी प्रकाश ( Tejasswi Prakash), शमिता शेट्टी ( Shamita Shetty) आणि निशांत भट्ट ( Nishant Bhat) यांच्यात चुरशीची लढत आहे.
या सर्व स्पर्धकांनी बिग बॉसच्या घरात3 महिन्यांपेक्षा अधिक काळ घालवला आणि सरतेशेवटी फिनालेमध्ये आपली जागा पक्की केली. यापैकी बिग बॉसच्या ट्रॉफीवर कोण आपलं नाव कोरणार? ही उत्सुकता आहे. मात्र त्याआधी सोशल मीडियावर विनरच्या नावाचा एक फोटो व्हायरल होतोय. या फोटोने इंटरनेटवर धुमाकूळ घातला आहे.
सलमान खानने विजेत्याची घोषणा करण्याआधी विकिपीडिया पेजचा एक फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.
या फोटोमध्ये प्रतिक सहजपाल ‘बिग बॉस 15’चा विजेता आणि शमिता शेट्टी उपविजेती असल्याचा दावा करण्यात आला आहे.
इंटरनेटवर व्हायरल या फोटोमध्ये विनरच्या नावासोबतच, त्याला मिळणाऱ्या बक्षिसाच्या रकमेची माहितीही दिली आहे. विजेत्यांना 50 लाख रुपयांचं बक्षीस देण्यात येणार असल्याचा दावा या फोटोमध्ये करण्यात आला आहे.
यापूर्वी देखील असाच एक फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. त्यावेळी करण कुंद्रा विजेता तर तेजस्वी प्रकाश उपविजेता असल्याचा दावा करण्यात आला होता. काही दाव्यांमध्ये शमिता शेट्टी ही ‘बिग बॉस 15’ची विजेती असल्याचं म्हटलं आहे. या फोटोमध्ये किती सत्य आहे ते आज रात्री समजणार आहे. विजेता कोण यासाठी प्रेक्षकांना जास्त वाट पाहावी लागणार नाही. काहीच तासांत ‘बिग बॉस 15’चा विजेता कोण हे प्रेक्षकांना कळणार आहे.
‘बिग बॉस 15’चा फिनाले काल रात्री सुरूझाला आहे. कालच्या एपिसोडमध्ये रश्मी देसाई बेघर झाली. सूत्रांच्या मते, निशांत भट्ट हाही पैशांची ब्रिफकेस घेऊन शो सोडणार आहे. त्यापाठोपाठ करण आणि तेजस्वी हे सुद्धा बाद होणार असून सरतेशेवटी शमिता व प्रतिक असे दोन स्पर्धक राहणार आहेत.