Bigg Boss 15 : अभिजीत बिचुकले म्हणाला, ‘पैरों की जूती’, अशी भडकली शमिता शेट्टी
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 5, 2021 15:48 IST2021-12-05T15:47:12+5:302021-12-05T15:48:28+5:30
Bigg Boss 15 : ‘बिग बॉस 15’च्या घरात चौघांनी वाइल्ड कार्ड एन्ट्री घेतली आणि शोमध्ये राडा सुरु झाला. होय, शमिता शेट्टी व देवोलिना भट्टाचार्जीच्या भांडणाचा एक अंक गाजला आणि यानंतर शमिता व अभिजीत बिचुकले यांच्यात जोरदार राडा झाला.

Bigg Boss 15 : अभिजीत बिचुकले म्हणाला, ‘पैरों की जूती’, अशी भडकली शमिता शेट्टी
Bigg Boss 15 : ‘बिग बॉस 15’च्या घरात चौघांनी वाइल्ड कार्ड एन्ट्री घेतली आणि शोमध्ये राडा सुरु झाला. होय, शमिता शेट्टी व देवोलिना भट्टाचार्जीच्या भांडणाचा एक अंक गाजला आणि यानंतर शमिता व अभिजीत बिचुकले यांच्यात जोरदार राडा झाला. अभिजीत बिचुकले (Abhijit Bichukale) व शमितामध्ये (Shamita Shetty) इतकं जोरदार भांडण झालं की सलमानही भडकला.
होय, रश्मी देसाई असभ्य भाषेचा वापर केल्याबद्दल आणि शमिताला ‘पैरों की जूती’ म्हटल्याबद्दल अभिजीत बिचुकलेला ‘बिग बॉस’च्या घरातील गुन्हेगार हा टॅग देते. अभिजीतने आपल्याला ‘पैरों की जूती’ म्हटलं हे ऐकून शमिता भडकते आणि शो सोडण्याची इच्छा व्यक्त करते. मला अशा माणसासोबत राहायचं नाही. मी इथे अपमान करून घ्यायला आलेली नाही, असं ती म्हणते. अशा माणसाला शोमध्ये आणलंच का? असा सवाल शमिता करते आणि सलमान भडकतो.
‘त्यानी तुला पैरों की जूती म्हटल्यानंतर तू तशी ठरतेस का? हा इथे का आला, असं तू अभिजीतला म्हणाली. हे योग्य नाही शमिता. लानत है,’असं सलमान म्हणतो.
बिग बॉसने अलीकडे स्पर्धकांना ‘जंगल मे मकडी’ हा टास्क दिला होता. या टास्कदरम्यान अभिजीत व शमिता यांच्यात जोरदार राडा झाला होता.
अभिजीत बिचुकले हा ‘बिग बॉस मराठी’मध्ये दिसला होता. ‘बिग बॉस मराठी’मध्ये त्यानं अक्षरश: घर डोक्यावर घेतलं होतं. आता हाच बिचुकले बिग बॉस 15 मध्ये आला म्हटल्यावर तो काय करतो, याकडे चाहत्यांचं लक्ष लागलं आहे. ‘बिग बॉस 15’मध्ये एन्ट्री घेण्याआधीच बिचुकलेला कोरोनाची लागण झाल्याची माहिती होती. त्यामुळे त्याची एन्ट्री काहीशी लांबली होती.