याला कुणी आवरा रे...! ‘किस’ प्रकरणानंतर अभिजीत बिचुकलेनं शमिता शेट्टीवर केली शॉकिंग कमेंट

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 22, 2021 12:50 IST2021-12-22T12:49:53+5:302021-12-22T12:50:59+5:30

Abhijeet Bichukale On Shamita Shetty: ‘बिग बॉस 15’मध्ये वाईल्ड कार्ड एन्ट्री घेणाऱ्या अभिजीत बिचुकलेचं नाव सध्या चांगलंच चर्चेत आहे. अर्थात वादांमुळे.

Bigg boss 15 Abhijeet Bichukale Comments On Shamita Shetty Career | याला कुणी आवरा रे...! ‘किस’ प्रकरणानंतर अभिजीत बिचुकलेनं शमिता शेट्टीवर केली शॉकिंग कमेंट

याला कुणी आवरा रे...! ‘किस’ प्रकरणानंतर अभिजीत बिचुकलेनं शमिता शेट्टीवर केली शॉकिंग कमेंट

बिग बॉस 15’मध्ये (Bigg Boss 15) वाईल्ड कार्ड एन्ट्री घेणा-या अभिजीत बिचुकलेचं (Abhijeet Bichukale) नाव सध्या चांगलंच चर्चेत आहे. अर्थात वादांमुळे. बिचुकले बोलतो आणि रोज नवा वाद ओढवून घेतो. अलीकडे तो  देवोलिना भट्टाचार्जी हिला किस मागताना दिसला. यावरून बिग बॉसच्या घरात आणि घराबाहेरही जोरदार ‘हंगामा’ झाला. हा वाद शांत होण्याआधीच आता बिचुकले नव्या वादामुळे चर्चेत आला आहे.
होय, आता बिचुकलेने शमिता शेट्टीसोबत (Shamita Shetty) पंगा घेतला. ‘टिकट टू फिनाले’ टास्कदरम्यान शमिता व बिचुकले यांच्यात जबरदस्त वादविवाद झाला आणि या वादादरम्यान बिचुकले नको ते बोलला.

अभिजीत बिचुकले राखीसमोर बढाया मारत असताना त्याच्या एका वाक्याने शमिता खवळली. मी 21 वर्षांपासून या इंडस्ट्रीत आहे. काय करायचं हे माझ्यासकट घरातील प्रत्येकाला चांगलं ठाऊक आहे. पण तू जे काही बोलतोस ना, तो मूर्खपणा आहे, असं शमिता म्हणते आणि तिथून निघून जाते. यावर बिचुकले शांत कसा बनणार?  मी सुद्धा लोकांचं मनोरंजन करतोय. तू 21 वर्षांपासून असून इथे काय दिवे लावत आहेस? तुला तर जहर चित्रपटानंतर काम सुद्धा मिळालं नाही, असं बिचुकले म्हणतो. त्याचे ते शब्द ऐकून राखी सावंतही सुन्न होते. यादरम्यान बिचुकले शमिताची बहीण शिल्पा शेट्टीच्या नावाचाही उल्लेख करतो. शिल्पा शेट्टीचं नाव घेताच हिला (शमिता) काही होतं. मी हा मुद्दा एखाद्या दिवशी काढेल, असंही तो म्हणतो.

‘बिग बॉस 15’ आता अंतिम टप्प्यात आहेत आणि फिनालेकडे शोची वाटचाल सुरू आहे. राखी सावंत फिनालेमध्ये जाणारी पहिली स्पर्धक ठरली आहे. आता फिनालेमध्ये जाण्यासाठभ सर्वच स्पर्धक जोर लावत आहेत. तेजस्वी प्रकाश, करण कुंद्रा, प्रतीक सहजपाल, उमर रियाज, शमिता शेट्टी हे तगडे स्पर्धक घरात आहेत. आता यांच्यापैकी कोण बिग बॉसची ट्रॉफी जिंकतो आणि तोपर्यंत घरात काय काय घडतं, ते बघूच.

Web Title: Bigg boss 15 Abhijeet Bichukale Comments On Shamita Shetty Career