Bigg Boss 15: बिग बॉसचा १५ वा सीझन आजपासून येणार भेटीला, हे आहेत स्पर्धक
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 2, 2021 16:28 IST2021-10-02T16:27:51+5:302021-10-02T16:28:14+5:30
सलमान खान नेहमीप्रमाणे यावर्षीही स्पर्धकांच्या स्वागतासाठी सज्ज झाला आहे.

Bigg Boss 15: बिग बॉसचा १५ वा सीझन आजपासून येणार भेटीला, हे आहेत स्पर्धक
बिग बॉसच्या १५व्या सीझनला आजपासून सुरूवात होणार आहे. सलमान खान नेहमीप्रमाणे यावर्षीही स्पर्धकांच्या स्वागतासाठी सज्ज झाला आहे. यावर्षीदेखील दरवर्षीप्रमाणे वेगळा अनुभव प्रेक्षकांना मिळणार आहे. यंदा स्पर्धकांना जंगलातून बिग बॉसच्या घरात जाण्याचा रस्ता शोधावा लागणार आहे. स्पर्धकांसाठी हे खूप मोठे आव्हान असणार आहे. यंदाच्या सीझनमध्ये कोण कोण स्पर्धक पहायला मिळणार याची उत्सुकता प्रेक्षकांमध्ये आहे.
बिग बॉस १५मध्ये यंदा तेजस्वी प्रकाश, अकासा सिंह, प्रतीक सहजपाल, शमिता शेट्टी, निशांत भट्ट, डोनल बिष्ट, उमर रियाज, करन कुंद्रा, ईशान सहगल आणि सिंबा नागपाल, मीशा अय्यर, साहिल श्रॉफ, विधि पंड्या, विशाल कोटियन आणि जय भानुशाली हे कलाकार दिसणार आहेत.
जयने शेवटच्या क्षणी बिग बॉसच्या घरात एन्ट्री मारली आहे. त्याचा एक प्रोमोदेखील कलर्स वाहिनीकडून प्रदर्शित केला आहे. जय भानुशालीने बऱ्याच मालिका आणि हिंदी चित्रपटात काम केले आहे.
बिग बॉस १५मध्ये तितलियां गाण्याची गायिका अफसाना खानदेखील दिसणार होती. मात्र आता असे समजते आहे की तिची तब्येत खराब झाल्यामुळे तिने हा शो सोडला आहे. तसेच बॉलिवूड अभिनेत्री रिया चक्रवर्तीदेखील यंदा बिग बॉसच्या घरात दिसणार अशी चर्चा रंगली होती. तसेच तिला निर्मात्यांनी एका आठवड्यासाठी ३५ लाख रुपये मानधन ऑफर केले होते. मात्र काही कारणास्तव ती या शोचा हिस्सा होऊ शकली नाही.