हाय गर्मी..! टीव्हीवरील 'संस्कारी बहू'च्या स्विमिंग पूलमधील बोल्ड फोटोंनी उडवली चाहत्यांची झोप, म्हणाले...

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 7, 2023 13:03 IST2023-01-07T12:42:48+5:302023-01-07T13:03:36+5:30

टीव्हीवरील संस्कारी बहूच्या बोल्ड अवतार पाहून चाहत्यांची झोप उडाली आहे. अभिनेत्रीच्या या फोटोंनी इंटरनेटचे तापमान वाढवले ​​आहे.

Bigg boss 14 winner Rubina Dilaik bold photoshoot in monokini pics goes viral on social media | हाय गर्मी..! टीव्हीवरील 'संस्कारी बहू'च्या स्विमिंग पूलमधील बोल्ड फोटोंनी उडवली चाहत्यांची झोप, म्हणाले...

हाय गर्मी..! टीव्हीवरील 'संस्कारी बहू'च्या स्विमिंग पूलमधील बोल्ड फोटोंनी उडवली चाहत्यांची झोप, म्हणाले...

Bigg Boss 14 Winner Rubina Dilaik Bold Photoshoot: प्रसिद्ध टीव्ही अभिनेत्री आणि 'बिग बॉस 14' ची विजेती रुबिना दिलैक अभिनयासोबतच सोशल मीडियावरही खूप सक्रिय असते.'बिग बॉस 14' ची विजेती बनल्यानंतर रुबिना सतत चर्चेत असते. रुबीनाची गणना इंडस्ट्रीतील बोल्ड आणि हॉट अभिनेत्रींमध्ये केली जाते. ती तिचे बोल्ड फोटोशूटने चाहत्यांना वेड लावत असते. दरम्यान, जानेवारीच्या थंडीत रुबिनाने पुन्हा एकदा इंटरनेटचे तापमान वाढवले ​​आहे. रुबिनाचे लेटेस्ट बोल्ड फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.

पूलमध्ये उतरली रुबिना
रुबिना दिलैकने तिच्या लेटेस्ट फोटोशूटचे फोटो इंस्टाग्राम अकाउंटवर शेअर केले आहेत. या फोटोंमध्ये रुबिना कडाक्याच्या थंडीत मोनोकिनी परिधान करून पूलमध्ये उतरलेली दिसत आहे. प्रत्येक फोटोमध्ये रुबिना सिझलिंग  स्टाईलमध्ये पोझ देताना दिसत आहे. रुबिनाच्या या फोटोंमुळे चाहते घायाळ झाले आहेत.

रुबिना दिलैकचे हे फोटो चाहत्यांना खूप आवडले आहेत. यावर कमेंट करून यूजर्स त्याचे कौतुक करताना दिसत आहेत. यावर कमेंट करताना एका यूजरने लिहिले की, 'रुबी तू माझ्या फोनच्या स्क्रीनला आग लावलीस.' तर एकाने लिहिले की, 'रुबिना जी थंडी आहे की नाही?' याआधीही रुबिनाचे अनेक फोटो चर्चेत आले आहेत. टेलिव्हिजनवर रुबीना दिलैकने छोटी बहू मालिकेतून कारकीर्दीची सुरूवात केली होती. याशिवाय रुबीना शक्ती अस्तित्व के अहसास मालिकेत झळकली आहे. 

Web Title: Bigg boss 14 winner Rubina Dilaik bold photoshoot in monokini pics goes viral on social media