कोण आहे ‘बिग बॉस 14’ची पहिली स्पर्धक? मुंबईत नाही तर या ठिकाणी असणार यंदाचा मुक्काम!!
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 6, 2020 15:27 IST2020-05-06T12:10:55+5:302020-05-06T15:27:11+5:30
सुरू झाली नव्या सीझनची तयारी

कोण आहे ‘बिग बॉस 14’ची पहिली स्पर्धक? मुंबईत नाही तर या ठिकाणी असणार यंदाचा मुक्काम!!
‘बिग बॉस 13’चा सीझन कधी नव्हे इतका गाजला होता. आत्तापर्यंतच्या सर्व सीझनमधील सर्वाधिक हिट ठरलेल्या या सीझननंतर आता नव्या सीझनची तयारी सुरु झाली आहे. केवळ इतकेच नाही तर ‘बिग बॉस 14’च्या काही स्पर्धकांची नावेही समोर आली आहेत. आणखी खास गोष्ट म्हणजे, यंदा ‘बिग बॉस’चे लोकेशनही बदलणार असल्याचे सांगण्यात येत आहे.
‘बिग बॉस 13’मध्ये शहनाज गिल, सिद्धार्थ शुक्ला, रश्मि देसाई, आसिम रियाज, आरती सिंह, पारस छाब्रा आणि माहिरा शर्मा यांच्यासह आणखी काही स्पर्धकांनी सहभाग घेतला होता. या सीझनने लोकप्रियेतचा उच्चांक गाठला होता. आता या फुल आॅन एंटरटेनमेंट शोच्या नव्या सीझनची तयारी सुरु झाली असल्याचे कळतेय.
गतवर्षी ‘बिग बॉस 13’चा सेट लोणावळ्यात नाही तर मुंबईच्या फिल्म सिटीत उभारण्यात आला होता. (याच ठिकाणी ‘बिग बॉस मराठी 2’चा सेटही उभारण्यात आला होता.) यंदाही ‘बिग बॉस 14’चा मुक्काम वेगळ्या ठिकाणी हलवण्यात येणार असल्याची चर्चा आहे. होय, मुंबईऐवजी गोव्यात या सीझनचे शूट होणार असल्याचे बोलले जात आहे जात आहे.
याशिवाय 14 व्या सीझनच्या पहिल्या स्पधार्काच्या नावाचा खुलासा झाल्याचे बोलले जात आहे. एनडीटीव्हीने दिलेल्या वृत्तानुसार मॉडेल, अभिनेत्री आणि सिंगर पूनम कारेकर बिग बॉस 14 ची पहिली स्पर्धक असल्याचे मानले जात आहे. याशिवाय या सीझनमध्ये जास्मिन भसीन, अलिशा पवार आणि करण कुंद्रा यांची नावेही या सीझनसाठी चर्चेत आहेत.
पुनम कारेकर लवकरच एका सिनेमात दिसणार आहे. हा सिनेमा माजी संरक्षण मंत्री आणि गोव्याचे दिवंगत माजी मुख्यमंत्री मनोहर पर्रिकर यांच्या जीवनावर आधारित आहे. या सिनेमात एका पत्रकाराची भूमिका साकारणार आहे. जिने 20 वर्षांपूर्वी पर्रिकरांची मुलाखत घेत आपल्या करिअरची सुरुवात केली होती.