Bigg Boss 14: 'नागिन 4'नंतर निया शर्माची होणार बिग बॉसच्या घरात एंट्री!

By ऑनलाइन लोकमत | Published: August 11, 2020 11:23 AM2020-08-11T11:23:49+5:302020-08-11T11:27:07+5:30

नियाची 'नागिन 4' ही मालिका लवकरच संपणार आहे.

Bigg boss 14 nia sharma to participate in salman khan show bigg boss | Bigg Boss 14: 'नागिन 4'नंतर निया शर्माची होणार बिग बॉसच्या घरात एंट्री!

Bigg Boss 14: 'नागिन 4'नंतर निया शर्माची होणार बिग बॉसच्या घरात एंट्री!

googlenewsNext

टीव्हीची हॉट आणि ग्लॅमरस अभिनेत्री निया शर्माच्या चाहत्यांसाठी एक गुडन्युज आहे. हिंदुस्तान टाईम्सच्या रिपोर्टनुसार, निया 'बिग बॉस 14'चा भाग होणार आहे. नियाला गेल्यावर्षी बिग बॉसचा हिस्सा बनण्यासाठी ऑफर मिळाली होती. मात्र नियाने नकार दिला. रिपोर्टनुसार निया यावर्षी 'बिग बॉस 14'चा भाग होण्यासाठी तयार झाली आहे. शोच्या निर्मात्यांशी मानधन आणि इतर गोष्टींबद्दल चर्चा झाली आहे. 

नियाची 'नागिन 4' ही मालिका लवकरच संपणार आहे. या मालिकेनंतर आता नागिन 5 प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे ज्यात मुख्य भूमिकेत हिना खान दिसणार आहे. 

 निया शर्मा टीव्हीवरची सर्वाधिक बोल्ड अन् ग्लॅमरस अभिनेत्री म्हणून परिचित आहे. ‘एक हजारों में मेरी बहना है’ या मालिकेतून तिने छोट्या पडद्यावर पदार्पण केले होते. यानंतर ती ‘जमाई राजा’ या मालिकेत दिसली. यापाठोपाठ ‘खतरों के खिलाडी’च्या आठव्या सीझनमध्येही ती दिसली.

निया सोशल मीडियावर कमालीची अ‍ॅक्टिव्ह असते. इन्स्टाग्रामवर तिचे लाखो फॉलोवर्स आहेत. 2017 मध्ये ‘सेक्सिएस्ट एशियन वूमन’च्या यादीत निया तिस-या स्थानावर होती. पण 2018 मध्ये मात्र तिने तिस-या स्थानावरून दुस-या स्थानावर उडी घेतली होती. लंडन येथील ’इस्टर्न आय’ या मॅगझिनने ही 50 ‘सेक्सिएस्ट एशियन वूमन’ची यादी जाहीर केली होती.

Web Title: Bigg boss 14 nia sharma to participate in salman khan show bigg boss

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.