Bigg Boss 14 : अन् उतावीळ चाहत्यांनी थेट एजाज खान व पवित्रा पुनियाचे ‘लग्न’ लावून दिले!!
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 10, 2021 16:40 IST2021-01-10T16:40:17+5:302021-01-10T16:40:42+5:30
पवित्रा एजाजला भेटायला बिग बॉसच्या घरात आली आणि...

Bigg Boss 14 : अन् उतावीळ चाहत्यांनी थेट एजाज खान व पवित्रा पुनियाचे ‘लग्न’ लावून दिले!!
‘बिग बॉस’चा 14 वा सीझन सध्या वेगवेगळ्या कारणांनी गाजतोय. एकीकडे विरह आणि दुसरीकडे मिलन असे चित्र सध्या दिसतेय. एकीकडे जास्मीन भसीन शोमधून बाहेर झाल्याने अली गोनी विरहाचे अश्रू रडतोय. दुसरीकडे पवित्रा पुनिया यांच्या भेटीने एजाज खानला आनंदाचे भरते आले आहे. होय, बिग बॉसने एजाजला पवित्रा पुनियाच्या भेटीच्या रूपात मोठे सरप्राईज दिले. पवित्रा एजाजला भेटायला बिग बॉसच्या घरात आली आणि तिने एजाजवरच्या प्रेमाची कबुली दिली. इतकेच नाही, तर माझ्या आईबाबांनी परवानगी दिली आहे आणि आता फक्त तुला माझ्या बाबांना भेटून मला मागणी घालायची आहे, असेही पवित्रा म्हणाली.
नॅशनल टीव्हीवर पवित्राने अशा पद्धतीने एजाजवरचे प्रेम जगजाहिर केले आणि चाहत्यांच्या उत्साहालाही जणू भरती आली. चाहत्यांनी काय करावे तर थेट फोटोशॉपच्या मदतीने एजाज व पवित्राचे लग्न लावून दिले.
Love always wins ....
— Vaishnavi (@Vaishna27631044) January 9, 2021
We are waiting to see them like this...💕😁#pavijaz#PavitraPunia#EijazKhanpic.twitter.com/QQSrOd6qpXhttps://t.co/lBw4MYSdrN
होय, पवित्रा व एजाजच्या भेटीनंतर सोशल मीडियावर दोघांचेही फोटोशॉप्ड फोटो व्हायरल झालेत. या फोटोत पवित्राच्या भांगेत कुंकू आहे. हातात लाल चुडा आहे. एजाज पवित्राच्या डोळ्यात पाहतोय. अर्थात हा फोटो फोटोशॉप्ड आहे. यानंतर एजाज व पवित्रा दोघेही सोशल मीडियावर ट्रेण्ड करू लागलेत.
एजाज व पवित्रा बिग बॉसच्या घरातच एकमेकांच्या प्रेमात पडले. दोघांनीही एकाचवेळी बिग बॉसच्या घरात एन्ट्री घेतली. यादरम्यान दोघांत अनेकदा वाद झालेत आणि तसेच प्रेमही बहरले. काही आठवड्यानंतर पवित्रा घरातून आऊट झाली. मात्र एजाज अद्यापही बिग बॉसच्या घरात टिकून आहेत.
एजाज खान हा ‘काव्यांजली’ या टीव्ही शोमुळे नावारूपास आला होता. पुढे ‘तनु वेड्स मनु’ या सिनेमातही तो झळकला. कुछ ना कहो, मीराबाई नॉट आऊट, जिला गाजियाबाद, लकी कबुतर, शोरगुल, अपस्टार्ट या सिनेमातही त्याने भूमिका साकारल्या.