Bigg Boss 14 : लव्ह लाईफला घेऊन चर्चेत राहिला गायक राहुल वैद्य, अलका याग्निकच्या मुलीसोबत जोडले गेले होते नाव
By गीतांजली | Updated: October 3, 2020 12:39 IST2020-10-03T12:31:28+5:302020-10-03T12:39:07+5:30
'बिग बॉस 14' सुरु होण्यासाठी काहीच तास बाकी आहेत.

Bigg Boss 14 : लव्ह लाईफला घेऊन चर्चेत राहिला गायक राहुल वैद्य, अलका याग्निकच्या मुलीसोबत जोडले गेले होते नाव
'बिग बॉस 14' सुरु होण्यासाठी काहीच तास बाकी आहेत. गायक राहुल वैद्यसुद्धा बिग बॉसच्या घरात जाणार आहे. राहुल वैद्य सोनी टीव्हीवरील रिअॅलिटी शो इंडियन ऑडलच्या फिनालेपर्यंत पोहोचला होता मात्र ट्रॉफी नाही जिंकू शकला. राहुल वैद्य इंडियन ऑडलचा फर्स्ट रनअप होतो.
बॉलिवूड लाईफच्या रिपोर्टनुसार राहुल वैद्यने एता मुलाखती दरम्यान सांगितले होते की, शाळेच्या दिवसांतच राहुल आपल्या सीनिअरच्या प्रेमात पडला होता. इंडियन ऑडलमध्ये आल्यानंतर राहुल वैद्यचे नाव अनेक तरुणींशी जोडण्यात आले. काही वर्षांपूर्वी अशीदेखील चर्चा होती की राहुल गायिका अलका याग्निक यांची मुलगी श्रेया कपूरला डेट करत होता. त्यानंतर राहुलचे नाव टीव्ही अभिनेत्री दिशा परमारसोबत जोडण्यात आले.दोघे एका म्युझिक व्हिडीओमध्ये एकत्र दिसले होते. सोशल मीडियावर दोघांचे फोटो राहुल शेअर करत असतो.
अभिनयात सुद्धा राहुलने आजमावले नशीब
सोनू निगम, मीका सिंग आणि शानसारखे राहुल वैद्यने सुद्धा अभिनयात नशीब आजमावले आहे. 2016मध्ये राहुलने एक इंडो बांग्लादेशी सिनेमा साईन केला होता. या सिनेमात राहुल वैद्यने बंगाली कलाकार रिया चटर्जी आणि रिया सेनसोबत काम केले होते. राहुल वेद्यने अनेक म्युझिक अल्बमला आवाज दिला आहे. राहुल बॉलिवूडमध्ये अनेक गाणी गायली आहेत.
Bigg Boss 14 : पवित्रा पुनियाचा अनेक वेळा झाला प्रेमभंग, एकदा तर साखरपुडा होऊन मोडले लग्न