टीव्हीवरील सगळ्यात विवादीत शो बिग बॉस 14 अवघ्या काही तासांतच सुरु होणार आहे. रुबीना दिलाइक, अभिनव शुक्ला, जॅस्मिन भसीन, निशांत सिंह मलखानी, सारा गुरपाल, निक्की तंबोळी, राहुल वैद्य, शार्दुल पंडित, शहजाद पोल, नैना सिंग, प्रतीक सहजल,  पवित्रा पुनिया हे स्पर्धक म्हणून बिग बॉसच्या घरात एंट्री घेऊ शकतात.  पवित्र पुनिया ही टीव्ही जगातील प्रसिद्ध अभिनेत्री आहे, तिने अनेक नेगेटीव्ह भूमिका साकारल्या आहेत.


पवित्रा नेहमीच तिच्या पर्सनल लाईफला घेऊन चर्चेत राहिली. बॉलिवूड लाईफच्या रिपोर्टनुसार पवित्रा 2015मध्ये लग्न करणार होती. एका प्रसिद्ध उद्योगपतीसोबत तिचा साखरपुडादेखील झाला होता मात्र लग्नाच्या आधीच हे नातं संपुष्टात आलं.

पारसा छाबडासोबत होती रिलेशनशीपमध्ये
पवित्रा पारसा छाबडासोबत रिलेशनशीपमध्ये होता. सोशल मीडियावर शेअर केलेले फोटो याचा पुरावा आहेत की पारस छाबडा आणि पवित्र पुनिया खूप रोमँटिक स्टाईलमध्ये दिसले होते. काही काळानंतर त्यांचे ब्रेकअप झाले आणि पारसाच्या आयुष्यात आकांक्षा पुरीची एंट्री झाली. 


एक्स बॉयफ्रेंडसोबत घेणार बिग बॉसमध्ये एंट्री
पवित्रा पुनिया एकता कपूरच्या 'नागिन 5' मध्ये दिसली होती. यानंतर ती बालवीर रिटर्न्समध्ये झळकली. आता बालवीर  रिटर्न्समध्ये बाय-बाय करते बिग बॉस 14 मध्ये एंट्री घेते आहे. रिपोर्टनुसार बिग बॉसच्या घरात पवित्रा एक्स बॉयफ्रेंड प्रतीक सहजपालसोबत एंट्री करण्याची शक्यता आहे.सोशल मीडियावप पवित्रा खूपच सक्रिय असते. आपले हॉट फोटोंमुळे ती नेहमी चर्चेत असते. 

'बिग बॉस 14' मधील हाएस्ट पेड कंटेस्टेंट आहे राधे माँ, एका आठवड्यासाठी घेणार इतके लाख

 

वाचकहो, 'लोकमत CNX Filmy'ला टेलिग्रामवर फॉलो करताय ना?... अजून जॉईन केलं नसेल तर क्लिक करा ( @LokmatCNXFilmy ) आणि मिळवा महत्त्वाचे अपडेट्स अन् ताज्या बातम्या!

Web Title: Bigg boss 14 contestant pavitra punia complete profile check out unknown facts

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.