Bigg Boss 13: घरात एंट्री करणार सिद्धार्थ शुक्ला,लवकरच करणार कॉन्ट्रॅक्ट साईन

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 22, 2019 14:44 IST2019-07-22T14:42:15+5:302019-07-22T14:44:46+5:30

'खतरों के खिलाडी ७' या शो चा विजेता सिद्धार्थ शुक्ला  बनला होता.  ‘झलक दिखला जा’ मध्ये त्याच्या डान्स मुव्हज मुळे त्याची खूप चर्चा झाली होती. मात्र सिद्धार्थ ख-या अर्थाने 'बालिका वधू' मालिकेतून शुक्ला घराघरात पोहचला.

Bigg Boss 13: Siddharth Shukla to enter the house, To Sign Contract To Be Soon | Bigg Boss 13: घरात एंट्री करणार सिद्धार्थ शुक्ला,लवकरच करणार कॉन्ट्रॅक्ट साईन

Bigg Boss 13: घरात एंट्री करणार सिद्धार्थ शुक्ला,लवकरच करणार कॉन्ट्रॅक्ट साईन

लवकरच बिग बॉस 13 सिझन रसिकांच्या भेटीला येणार आहे. यंदाचा सिझनही इतर सिझनप्रमाणे धमाकेदार असणार त्यामुळे रसिकांमध्येही या सिझनची कमालीची उत्सुकता पाहायला मिळते. वेगवेगळ्या सेलिब्रेटींची नावे सध्या समोर येत आहेत. मात्र लकरच याविषयी अधिकृत यादी जाहिर करण्यात येईल. आता आणखीन एका अभिनेत्याचे नाव समोर येत आहे. लोकप्रिय टीव्ही अभिनेता सिद्धार्थ शुक्ला. बिग बॉस 13 मध्ये सहभागी होणार असल्याचे माहिती मिळते.

'खतरों के खिलाडी ७' या शो चा विजेता सिद्धार्थ शुक्ला  बनला होता.  ‘झलक दिखला जा’ मध्ये त्याच्या डान्स मुव्हज मुळे त्याची खूप चर्चा झाली होती. मात्र सिद्धार्थ ख-या अर्थाने 'बालिका वधू' मालिकेतून शुक्ला घराघरात पोहचला. याच मालिकेने त्याला ख-या अर्थाने लोकप्रियता मिळून दिली.  मालिकेतील त्याच्या भूमिकेला रसिकांची तुफान पसंती मिळाली होती. 'बालिका वधू' मालिका संपल्यानंतर सिद्धार्थ दिल से दिल तक मालिकेत झळकला. त्याच्या  नंतर मालिकेत त्याचे  दर्शन काही घडले नाही. छोट्या पडद्यानंतर 'हम्पटी शर्मा की दुल्हनिया' या सिनेमातही त्याने प्रमुख भूमिका साकारली होती.

आता बिग बॉसच्या निमित्ताने तो पुन्हा छोट्या पडद्यावर झळकणार अशी आशा करणे चुकीचे ठरणार नाही. बिग बॉसचे निर्माते गेल्या काही महिन्यांपासून सिद्धार्थच्या संपर्कात असून सिद्धार्थनेही शोमध्ये सहभागी होण्यासाठी होकार कळवला असल्याचे समजतंय. लवकरच तो कॉन्ट्रॅक्ट साईन करणार आहे. त्यामुळे आता पर्यंत रूपेरी पडद्यावर दिसणारा सिद्धार्थ ख-या आयुष्यात कसा आहे जाणून घेण्याची रसिकांना उत्तम संधी मिळणार आहे.

Web Title: Bigg Boss 13: Siddharth Shukla to enter the house, To Sign Contract To Be Soon