Bigg Boss 13 : सलमान खान अमिषा पटेलला म्हणतो मीना कुमारी, हे आहे त्यामागचं कारण
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 24, 2019 17:22 IST2019-09-24T17:22:21+5:302019-09-24T17:22:50+5:30
बिग बॉसच्या १३व्या सीझनचं अनावरण नुकतंच पार पडलं. या सीझनमध्ये अभिनेत्री अमिषा पटेलदेखील महत्त्वाची भूमिका बजावणार आहे.

Bigg Boss 13 : सलमान खान अमिषा पटेलला म्हणतो मीना कुमारी, हे आहे त्यामागचं कारण
छोट्या पडद्यावरील लोकप्रिय व वादग्रस्त रिएलिटी शो बिग बॉसच्या 13व्या सीझनचं अनावरण नुकतंच पार पडलं. या सीझनमध्ये अभिनेत्री अमिषा पटेलदेखील महत्त्वाची भूमिका बजावणार आहे. मात्र ती नेमकी काय करणार आहे, याबाबतचा खुलासा अद्याप झालेला नाही.
बिग बॉसच्या तेराव्या सीझनच्या अनावरणावेळी सलमानने अमिषाची मस्करी केली आणि तिला मीना कुमारी असं संबोधलं. ती नेहमी रडत असते म्हणून तिला तो मीना कुमारी असं संबोधतो.
यावेळी अमिषाने सलमानच्या फिटनेसचं कौतूक केलं. ती म्हणाली की, सलमानच्या फिटनेसमुळे मला प्रेरणा मिळते. सलमानने जेव्हा अमिषाला बिग बॉस 13च्या घरात पाहण्याची इच्छा व्यक्त केली. तेव्हा उत्तरात अमिषा म्हणाली की, मी घरात जाणार नाही. पण, धमाका करणार एका वेगळ्या अवतारात. काही वर्षांपूर्वी अमिषाचा भाऊ अश्मित पटेल बिग बॉसच्या घरात स्पर्धक म्हणून सहभागी झाला होता.
अमिषा बिग बॉसमध्ये नेमकं काय करणार आहे, हे अद्याप गुपित ठेवण्यात आलं आहे. मात्र ती सलमानसोबत या शोचं सूत्रसंचालन करणार असल्याचाही तर्क लावला जातो आहे.
हिंदी बिग बॉस २९ सप्टेंबरला प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. यावेळी या शोमध्ये कुणीच सामान्य व्यक्ती नसणार आहे, फक्त सेलिब्रेटीज सहभागी असणार आहेत.
यंदा बिग बॉसचे घर लोणावळा ऐवजी मुंबईतील फिल्मसिटीत उभारण्यात आलं आहे.